भारत अद्यापही गुलामीत !
१५ ऑगस्ट १९४७ या दिवशी ब्रिटीश गेले म्हणून ‘इंडिया’ स्वतंत्र झाला, असे आपण मानतो. तसे शाळेत शिकवले जाते; परंतु भारतावर अजूनही ब्रिटिशांच्या आणि मोगलांच्या चेल्यांचे वर्चस्व असल्यामुळे खर्या अर्थाने ‘भारत स्वतंत्र झाला’, असे आपण म्हणू शकत नाही ! भारत अजूनही गुलामगिरीतून मुक्त होणे बाकी आहे. त्यासाठी परत एकदा स्वातंत्र्य मिळवण्यासाठी संघर्ष अटळ आहे ! स्वातंत्र्यासाठी वैचारिक युद्धच करावे लागणार आहे. यासाठी युवा स्वातंत्र्यसैनिकांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे. पुन्हा एकदा सर्वत्र रणशिंग फुंकण्याची आवश्यकता आहे.
मोगलांचे वंशज हिंदु मुलींना भ्रष्ट करत आहेत. त्यांच्यावर अत्याचार करत आहेत. सर्वत्र मुलींच्या किंकाळ्या ऐकू येतात; पण आपली युवा पिढी भ्रमणभाषमध्ये गुंतलेली आहे. कानात ‘ईअर फोन’ लावल्याने त्यांना कुणाचेच टाहो ऐकू येत नाहीत. साहाय्याला कुणीच येत नाही; म्हणून आपल्या मुली कारणाविना जीवन संपवत आहेत. हिंदु समाज अबला बनलेला आहे. त्यामुळे भारतात आग कशी लागेल, सत्ता संपादन करून हिंदु धर्म, हिंदु समाज देशोधडीला कसा लागेल ? अशाच षड्यंत्राचे नियोजन चालू आहे. त्यांना पूर्णपणे आर्थिक, शारीरिक साहाय्याचा ओघ विदेशातून चालू आहे. ‘कधी एकदा भारतात अराजक मजवण्याची संधी मिळणार ?’ याची जणू ते वाट बघत आहेत. शेतकर्यांना आंदोलन करून आरक्षणासाठी आंदोलन करून ठिणगी पाडण्याचे नियोजन हे मोगलांचे वंशज शोधत आहेत. भारतातील हिंदु युवा पिढीला त्याची किंचितही कल्पना येऊ दिलेली नाही. उलट ते आमच्या देवतांना कस्पटासमान कसे लेखतील, याकरिता खोटी कथानके रचून कार्यक्रम घडवतात. त्यासंबधी ग्रंथ छापून तरुणांना आपल्याकडे वळवून त्यांना हिंदु धर्म सोडायला लावून आपले इप्सित साध्य करतात.
आपली शैक्षणिकव्यवस्था, गुरुकुलपद्धत परत आणायची आहे. त्यासाठी आध्यात्मिक विश्वविद्यालयाची आवश्यकता आहे. आपली न्यायव्यवस्था पूर्णपणे गुरु-शिष्य परंपरेवर आधारित आणि ग्रामसभा आधारित सुराज्य परत एकदा चालू व्हायला पाहिजे. त्याला विरोध या मोगलांच्या वंशजांकडून, ब्रिटिशांच्या वंशजांकडून होणारच आहे. म्हणून संघर्ष अटळ आहे. त्यासाठी युद्धाला सामोरे जाण्यासाठी युवा पिढीने सिद्धता केली पाहिजे. तरुणांनी संघटित झाले पाहिजे. संघटनेची शक्ती निर्माण केली पाहिजे. त्या शक्तीने शत्रूला नामोहरम केले पाहिजे. त्याखेरीज तरणोपाय नाही. त्याविना खरे स्वातंत्र्य लाभणार नाही. भारत सर्वच क्षेत्रांत स्वतंत्र झाला पाहिजे. तेव्हाच आपण आनंदाने राहू शकतो, सुख-समाधान प्राप्त करू शकतो. ‘खरा स्वातंत्र्यदिन साजरा करण्याचे भाग्य आम्हा सर्वांना लाभो’, हीच ईश्वरचरणी स्वातंत्र्यदिनी प्रार्थना करूया !
– श्री. श्रीराम खेडेकर, फोंडा, गोवा.