आगाशिवनगर (कराड) येथे धर्मांधांकडून हिंदु महिलेवर आक्रमण

पवार कुटुंबियांना पोलिसांकडून चुकीची वागणूक दिल्याचे समजताच नितेश राणे यांनी पोलिसांना कठोर शब्दांत समज दिली

कराड, १५ ऑगस्ट (वार्ता.) – आगाशिवनगर येथे १२ ऑगस्ट या दिवशी काही व्यावसायिक मुसलमान युवकांनी हिंदु महिलेवर आक्रमण केले. याचे पडसाद शहरामध्ये उमटून आगाशिवनगर येथे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

व्यावसायिक कारणावरून मुसलमान समाजातील काही युवकांनी आगाशिवनगर येथे रहाणार्‍या पवार कुटुंबियांवर आक्रमण करून एका महिलेला मारहाण केली. यानंतर १३ ऑगस्टला दुपारी पोलिसांनी काही जणांवर गुन्हे नोंद करून त्यांना कह्यात घेतले. या प्रकरणी भाजपचे आमदार नितेश राणे यांनी मारहाण झालेल्या पवार कुटुंबियांची भेट घेऊन त्यांना धीर दिला. पवार कुटुंबियांना पोलिसांकडून चुकीची वागणूक दिल्याचे समजताच नितेश राणे यांनी पोलिसांना कठोर शब्दांत समज दिली. या प्रकरणी ‘सकल हिंदु समाजा’च्या वतीने ‘कराड बंद’ची हाक देण्यात आली होती; मात्र हा बंद मागे घेत प्रशासनाला निवेदन सादर करण्यात येणार असल्याचे सकल हिंदु समाजाच्या वतीने घोषित करण्यात आले.

आगाशिवनगर येथे घडलेल्या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन कराडचे पोलीस उपाधीक्षक अमोल ठाकूर यांनी घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवला. या वेळी आगाशिवनगर येथील शेकडो नागरिक हिंदु भगिनीच्या संरक्षणार्थ उत्स्फूर्तपणे रस्त्यावर उतरले होते.

संपादकीय भूमिका

  • हिंदु महिलेला मारणार्‍या धर्मांधाला शरियतनुसार कठोर शिक्षा का नको ?
  • धर्मांधांचा वाढता उद्दामपणा ! पोलिसांचा धाक नसल्यानेच असे प्रकार करण्याचे धर्मांधांचे धाडस होते. त्यामुळे ऊठसूट हिंदूंना मारहाण करणार्‍यांना कठोर शिक्षा करणे आवश्यक !