वसईत नायजेरियन महिलेला अमली पदार्थ प्रकरणी अटक !

वसई – तुळींज पोलिसांनी एडिका जोसेफ (वय ३० वर्षे) या नायजेरियन महिलेला अटक केली आहे. तिच्याकडून २ कोटी रुपयांचा मॅफेड्रॉन हा अमली पदार्थ जप्त केला आहे. (अमली पदार्थांच्या विक्रीत नायजेरियन लोकांचा अधिक सहभाग असूनही आतापर्यंत त्यांच्यावर कठोर कारवाई झाल्याचे ऐकिवात नाही. त्यामुळेच असे प्रकार वाढतात ! यावर पोलीस कधी नियंत्रण आणणार ? – संपादक) नालासोपारा शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अमली पदार्थांचा व्यवहार चालतो. पोलिसांनी मध्यरात्री धाड घालून हा साठा जप्त केला.

एडिका जोसेफच्या पारपत्राची मुदत संपूनही ती भारतामध्ये बेकायदेशीररित्या रहात होती. (हा प्रकार प्रशासनाच्या लक्षात कसा आला नाही ? पारपत्राची मुदत संपूनही भारतात रहाणार्‍यांचा शोध घ्यायला हवा ! – संपादक) तिच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.