Mumbra Tipu Sultan Posters : मुंब्रा येथे ‘सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया’च्या तिरंगा मिरवणुकीत धर्मांधांनी फडकावले टिपू सुलतानचे फलक !

  • पोलिसांनी मिरवणूक रोखली !

  • ‘टिपू सुलतान झिंदाबाद’च्या घोषणा : हिंदू संतप्त !

तिरंगा मिरवणुकीत टिपू सुलतानचे फलक (छायाचित्र सौजन्य – लोकसत्ता)

ठाणे, १५ ऑगस्ट (वार्ता.) – मुंब्रा येथे स्वातंत्र्यदिनानिमित्त ‘सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया’ने तिरंगा मिरवणूक काढली होती. यात धर्मांधांनी टिपू सुलतानचे छायाचित्र असलेले फलक हाती धरले होते. काही लोकांनी ‘टिपू सुलतान झिंदाबाद’च्या घोषणा दिल्या. तणाव निर्माण होऊ नये; म्हणून पोलिसांनी मिरवणूक रोखली. त्यामुळे धर्मांधांनी याचा निषेध केला.

‘टिपू सुलतान झिंदाबाद’च्या घोषणा दिल्याने हिंदूंनी संताप व्यक्त केला. स्थानिक पोलिसांनी टिपू सुलतानचे छायाचित्र असलेले फलक हटवण्याचा आदेश दिल्यावर स्थानिक मुसलमान नेते आणि कार्यकर्ते यांनी पोलिसांशी वाद घातला. (अशांवर पोलीस कारवाई करणार कि त्यांच्यासमोर नेहमीप्रमाणे नांगी टाकणार ? – संपादक)  

टिपूचे उदात्तीकरण करणार्‍यांना योग्य वेळी ठेचू ! – आमदार नितेश राणे, भाजप

भाजपचे आमदार नितेश राणे

टिपू सुलतानचे फलक लावणार्‍यांना योग्य वेळी ठेचण्याचा कार्यक्रम आम्ही हाती घेतला आहे. टिपू सुलतानच्या समोरच्या बाजूला त्या लोकांना लवकरच झोपवण्यात येईल.

संपादकीय भूमिका

  • मुसलमानांच्या भावना दुखवतात; म्हणून महाराष्ट्रात अफझलखानवधाचा फलक लावण्यावर बंदी घातली जाते; तर लाखो हिंदूंचे बलपूर्वक धर्मांतर करणार्‍या, सहस्रो हिंदु महिलांवर बलात्कार करणार्‍या आणि सहस्रो मंदिरे पाडणार्‍या हिंदुद्वेष्ट्या टिपू सुलतानचा फलक मिरवायला अनुमती दिली जाते ! हे १०० कोटी हिंदूंना लज्जास्पद ! टिपू सुलतानच्या फलकांवर महाराष्ट्रातच नाही, तर देशभरात बंदी घालण्याच्या मागणीसाठी हिंदू एकवटतील का ?
  • मुंब्रा येथे हिंदुद्वेष्ट्या टिपू सुलतानचे चित्र लावण्याला कुणाचा पाठिंबा आहे ?, हे जनतेसमोर आले पाहिजे ! हिंदूंनीच आता संघटित होऊन अशांवर कारवाई करण्यासाठी सरकारवर वैध मार्गाने दबाव आणायला हवा !
  • हा हिंदूंना डिवचण्याचा आणि आक्रमकांचे उदात्तीकरण करण्याचाच प्रकार नव्हे का ? यातून हिंदूंविरुद्ध काही षड्यंत्र रचले जात नाही ना ?, याची पोलिसांनी चौकशी करून सत्य जनतेसमोर आणणे आवश्यक आहे !