मुसलमान घुसखोरांना गावात रहाण्यास आणि व्यापार करण्यास बंदी !
कोन (भिवंडी) येथील ग्रामस्थांची फलकांच्या माध्यमातून चेतावणी
ठाणे, १५ ऑगस्ट (वार्ता.) – भिवंडी हा संवेदनशील भाग आहे. सध्या बांगलादेशमध्ये राजकीय अस्थिरता आहे. त्यामुळे संभाव्य घुसखोरीच्या पार्श्वभूमीवर भिवंडी येथील कोन गावातील ग्रामस्थ बांगलादेशी घुसखोरांविरोधात आक्रमक झाले आहेत. बांगलादेशी मुसलमान घुसखोरांना गावात रहाण्यास आणि व्यापार करण्यास बंदी असल्याची चेतावणी ग्रामस्थांनी फलकांच्या माध्यमातून दिली आहे.
बंधुता मानणार्या लोकांनी त्यांचे ज्ञान स्वतःजवळच ठेवावे. ग्रामस्थांनी ‘आपले गाव आपली जबाबदारी’, असा मजूर असलेले फलक लिहून ‘घुसखोर गावात कुठेही आढल्यास पोलिसांना संपर्क करा’, असे आवाहन केले आहे. या फलकांच्या छायाचित्राचे स्टेटस (‘स्टेटस’ म्हणजे इतरांना पहाता येण्यासाठी स्वतःच्या भ्रमणभाषवर ठेवलेले चित्र किंवा लिखाण) किंवा ‘व्हॉट्सअॅप डीपी’वर ठेवत जनजागृती करण्यात आली आहे.
संपादकीय भूमिका
|