Bihar Minor Rape Murder : अल्पवयीन मुलीची सामूहिक बलात्कारानंतर निर्घृण हत्या

मुझफ्फरपूर (बिहार) येथील घटना

मुझफ्फरपूर (बिहार) – येथे ९ वीच्या वर्गातील विद्यार्थिनीची सामूहिक बलात्कारानंतर हत्या करण्यात आली. आरोपींनी तिचे स्तन कापले, तसेच गुप्तांगावर चाकूने वार केले. १२ ऑगस्ट या दिवशी तिचा मृतदेह येथील तलावात अर्धनग्न अवस्थेत आढळून आला. तिच्या तोंडावर कापड बांधले होते. पालकांच्या तक्रारीवरून पोलिसांनी संजय राय याच्यासह ५ अज्ञातांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे.

पीडित विद्यार्थिनीच्या कुटुंबियांचे म्हणणे आहे की, ११ ऑगस्टला रात्री ५ जणांनी  ‘आम्ही तुमच्या मुलीवर बलात्कार करणार आहोत’, असे सांगत मुलीला पळवून नेले. काही दिवसांपूर्वी संजय राय याने ‘माझे तुमच्या मुलीशी लग्न लावून द्या, अन्यथा तिला ठार मारीन’, अशी धमकी दिली होती. त्याने आम्हाला भूमी देण्याचे आमीषही दाखवले; परंतु आम्ही आमच्या मुलीचे लग्न त्याच्याशी लावून देण्यास नकार दिला.

या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी पोलीस आणि सरकार यांचा निषेध करत २४ घंट्यांत आरोपींना अटक न केल्यास पोलीस ठाण्याला घेराव घालून राष्ट्रीय महामार्ग रोखण्याची चेतावणी दिली. आरोपींना अटक केल्यानंतरच मुलीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले जातील, अशी ठाम भूमिका गावकर्‍यांनी घेतली; मात्र प्रशासनाच्या सांगण्यावरून विद्यार्थिनीवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

संपादकीय भूमिका

यातील गुन्हेगारांना फाशीची शिक्षा होण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार यांनी प्रयत्न केला पाहिजे !