करभरणा केला नसल्याने शिर्डी विमानतळाला जप्तीची नोटीस, ८ कोटी ३० लाख रुपयांचा कर थकित !
कोपरगाव (जिल्हा अहिल्यानगर) – शिर्डी विमानतळाने वर्ष २०१६-१७ पासून आतापर्यंत ८ कोटी ३० लाख रुपयांचा मालमत्ताकर थकवला आहे. हा कर वसूल करण्यासाठी काकडी-मल्हारवाडी (ता. कोपरगाव) ग्रामपंचायतीने विमानतळाची जंगम मालमत्ता जप्त करण्याची नोटीस बजावली आहे. ही नोटीस महाराष्ट्र विमान विकास प्राधिकरण आस्थापनाच्या व्यवस्थापकांना दिली आहे.
सौजन्य : abp माझा
कर भरण्याविषयी अनेक वेळा पत्र दिले आहे. फेब्रुवारी २०२३ मध्ये दिलेले अंतिम स्मरणपत्र, करवसुलीची नोटीस, राष्ट्रीय लोकअदालत नोटीस, ग्रामपंचायतीच्या मासिक सभेचा ठराव देऊनही विमानतळाने करभरणा केलेला नाही, असेही आस्थापनांच्या व्यवस्थापकांना दिलेल्या नोटिसीमध्ये नमूद केले आहे.