Saharanpur News : अमली पदार्थ तस्कराला सोडवण्यासाठी मुसलमान जमावाकडून पोलिसांवर आक्रमण !
|
सहारनपूर (उत्तरप्रदेश) – जिल्ह्यातील घटमपूर गावात पोलिसांच्या कह्यात असलेल्या अमली पदार्थ तस्कर जावेदला सोडवण्यासाठी मुसलमान जमावाने पोलिसांवर आक्रमण केल्याची घटना नुकतीच घडली. या आक्रमणात महिला पोलिसांनाही लक्ष्य करण्यात आले. पोलिसांवर आक्रमण करणार्यांमध्ये काही बुरखाधारी महिलांचाही समावेश होता. आक्रमणकर्त्यांनी पोलिसांवर लाठ्या-काठ्यांनी आक्रमण केले आणि दगडफेकही केली. पोलिसांच्या वाहनाची तोडफोड करून त्यांचे गणवेश फाडण्यात आले. तसेच पोलिसांच्या डोळ्यात मिरचीपूड फेकून जावेदला पोलिसांच्या कह्यातून सोडवले. या हिंसाचारात सहभागी असलेल्या ३ महिलांसह एकूण ६ आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. उर्वरित आक्रमणकर्ते पसार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. (मुसलमान जमावाच्या तावडीत सापडल्यानंतर जेथे पोलिसांची गय नाही, तेथे सर्वसामान्य हिंदूंवर काय परिस्थिती ओढवत असेल, याचा विचारच करू शकत नाही. सर्वत्रचे मुसलमान नेहमी आक्रमणाच्या सिद्धतेतच असतात, हेच अशा घटनांतून वारंवार सिद्ध होते ! – संपादक)
सहारनपूर जिल्ह्यातील नकुड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटमपूर गावात अमली पदार्थ तस्कर जावेद लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलीस निरीक्षक नरेंद्र भदाना यांनी तात्काळ त्यांच्या पथकासह घटमपूर गाठले. जावेदला पोलिसांच्या पथकाने पकडले. पोलिसांचे पथक कायदेशीर कारवाईत व्यस्त असतांना अचानक जावेदने मोठ्याने ओरडून लोकांना गोळा करण्यास चालू केले. जावेदच्या गावातील मुसलमान घटनास्थळी पोचले. जावेदची सुटका करण्यासाठी त्यांनी पोलिसांना शिवीगाळ करत त्यांच्यावर आक्रमण केले, तसेच जावेदला पोलिसांच्या कह्यातून सोडवून घेतले.
या घटनेनंतर पोलिसांनी कठोर भूमिका घेतली आहे. पोलीस अधीक्षक देहत सागर जैन यांच्या नेतृत्वाखाली आक्रमणकर्त्यांवर कारवाई करण्यासाठी पोलिसांची पथके सिद्ध करण्यात आली आहेत. या प्रकरणी आतापर्यंत ६ आरोपींना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींना न्यायालयात उपस्थित केले असता त्यांची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
संपादकीय भूमिका
|