Ladki Bahin Yojana : १७ ऑगस्टला १ कोटीहून अधिक महिलांच्या खात्यात ३ सहस्र रुपये जमा होणार !
|
पुणे – महाराष्ट्र शासनाच्या बहुचर्चित ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजने’च्या अंतर्गत पहिला हप्ता १७ ऑगस्टला महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. या पहिल्या हप्त्याच्या अंतर्गत प्रत्येक लाभार्थी महिलेला २ महिन्यांचे मिळून एकूण ३ सहस्र रुपये मिळणार आहेत. १७ ऑगस्टला पुण्यातील बालेवाडी स्टेडियममध्ये भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून यास मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि सर्व जिल्ह्यांचे पालकमंत्री उपस्थित रहाणार आहेत. या कार्यक्रमात संगणकात एका क्लिकद्वारे १ कोटीहून अधिक महिलांच्या बँक खात्यात प्रत्येकी ३ सहस्र रुपये जमा होतील. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शासनाचे हे मोठे शक्तीप्रदर्शनच असल्याचे सांगण्यात येत आहे.