Obscene Messages : शिक्षिकेला अश्लील लघुसंदेश पाठवणारा प्रभारी मुख्याध्यापक महबूब अली यास चोप !
शिक्षिकेच्या पाया पडून क्षमा मागण्यास भाग पाडले
रायचूर (कर्नाटक) – एका शिक्षिकेला अश्लील लघुसंदेश पाठवल्याच्या प्रकरणी येथील एका सरकारी शाळेचा प्रभारी मुख्याध्यापक महबूब अली यास शिक्षिकेच्या कुटुंबियांनी चोप दिला.
Headmaster Mahboob Ali thrashed for sending obscene messages to female teacher; forced to apologise by falling at her feet
📍Raichur Karnataka
What moral lessons can such a lustful headmaster teach the students? pic.twitter.com/FSVkI5L0rG
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) August 14, 2024
शिक्षिकेने केलेल्या तक्रारीनुसार, महबूब अली याने ‘रात्री झोपायला ये, १० सहस्र रुपये देतो’, असा लघुसंदेश पाठवला होता. हा प्रकार शिक्षिकेने तिच्या कुटुंबियांना सांगितला. त्यानंतर शिक्षिकेच्या नातेवाइकांनी महबूब अली याला चांगलेच चोपले आणि त्याला शिक्षिकेच्या पाया पडून क्षमा मागण्यास भाग पाडले, तसेच त्याच्याकडून क्षमायाचनेचे पत्रही लिहून घेतले.
संपादकीय भूमिकाअसे वासनांध मुख्याध्यापक शाळेतील मुलांना नैतिकतेचे धडे काय देणार ? |