चिखली (पुणे) येथे पोलीस चौकीसमोरच असलेल्या मॉलचे शटर तोडून, तसेच अन्य २२ दुकानांत चोरी !
चिखली (जिल्हा पुणे) – मोरेवस्ती-म्हेत्रेवस्ती-नेवाळे वस्ती आणि चिखली गावठाण परिसरात १० ऑगस्टला पहाटे २२ दुकाने, तर ११ ऑगस्टला रात्री घरकुल परिसरातील काही टपर्यांमध्ये चोरी झाली. यात चोरांनी रोख रक्कम आणि दुकानातील इतर माल चोरी केला. विशेष म्हणजे मोरेवस्ती येथील पोलीस चौकीसमोरच असलेल्या एका मॉलचे शटर तोडून चोरांनी चोरी केली. तरीही पोलिसांना या घटनेचा सुगावा लागला नाही. ४ महिन्यांपूर्वी अशाच प्रकारे या परिसरातील अनेक दुकाने फोडून चोरी केली होती. एवढ्या चोर्या होऊनही रात्रपाळीवरील पोलीस नेमके काय करत आहेत ? असा प्रश्न पीडित दुकानदार करत आहेत. मेडिकलचे दुकान फोडल्या प्रकरणी गणेश चालखोर यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरांवर गुन्हा नोंद झाला आहे. पोलिसांकडून आरोपींचा शोध चालू आहे.
७ दिवसांच्या आत चोरांना अटक न केल्यास सर्व व्यापारी संघटना आणि काही पक्ष यांच्या वतीने आंदोलन करण्याची चेतावणी देण्यात आली आहे.
संपादकीय भूमिका :एवढ्या चोर्या होईपर्यंत पोलीस झोपले होते का ? पोलीस चौकीसमोरच चोरी करण्याचे चोरांचे धाडस होत आहे, याचा अर्थ पोलिसांचा धाक न्यून झाला आहे, असा होत नाही का ? |