मुंबईत ६५ सहस्रांहून अधिक अर्जांमध्ये त्रुटी !
|
मुंबई – राज्यशासनाच्या ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजने’च्या अंतर्गत मुंबई उपनगरांत एकूण ३ लाख ८७ सहस्र ९७३ अर्ज प्राप्त झाले, तर मुंबई शहरांत एकूण १ लाख ७१ सहस्र ७१५ अर्ज प्राप्त झाले. त्यांपैकी अनुक्रमे उपनगरांतील ४१ सहस्र ७६, तर शहरांतील २४ सहस्र ६ अर्जांमध्ये त्रुटी आढळून आल्या आहेत. त्यामुळे ते संमत करण्यात आलेले नाहीत. महिला आणि बालकल्याण विभागाच्या एका अधिकार्याने ही माहिती दिली. ज्यांच्या अर्जात त्रुटी असतील, त्यांनी पुन्हा त्या त्रुटींची पूर्तता करून अर्ज सादर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.