अंबरनाथ येथे वृद्धाचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार !

प्रतिकात्मक चित्र

अंबरनाथ – घरात एकटी असल्याचा अपलाभ घेऊन ओळखीच्या ७३ वर्षीय निसार ठाणगे याने १६ वर्षीय मुलीचे तोंड दाबले आणि तिच्यावर बलात्कार केला. ही घटना अंबरनाथ येथे घडली. या प्रकरणी ठाणगे याच्या विरोधात बलात्कारासह पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवून त्याला अटक करण्यात आली आहे. अत्याचार करतांना त्याने पीडितेला तिच्या आई-वडिलांना ठार मारण्याची धमकीही दिली होती.

निसार ठाणगे हा रायगड जिल्ह्यातील नेरळ भागात असलेल्या एका गावात रहातो, तर पीडिता अंबरनाथ येथे रहाते. ते दोघेही एकमेकांना ओळखतात. याचाच अपलाभ घेत त्याने वरील प्रकार केला. त्यानंतर तो फरार झाला होता. पोलिसांनी पकडून त्याला न्यायालयात उपस्थित केले. न्यायालयाने त्याला २ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

संपादकीय भूमिका :

समाजात नैतिकता उरली नसल्याचे दर्शवणारी घटना ! अशा वासनांधांना कठोर शिक्षा केल्याविना हे प्रकार थांबणार नाहीत !