नंदीग्राम एक्सप्रेसच्या शौचालयात प्रवाशाची आत्महत्या !
मुंबई – नंदीग्राम एक्सप्रेसच्या शौचालयात ३५ वर्षांच्या बाबासाहेब साबळे या प्रवाशाचा मृतदेह सापडला. साबळे हे घाटकोपर येथील रहिवासी होते. त्यांनी नंदीग्राम एक्सप्रेसमध्ये मफलरने गळफास घेऊन आत्महत्या केली.
मृत साबळे यांची पत्नी सुनीता हिने सांगितले की, साबळे यांना खोट्या गुन्ह्यात अडकवल्याने मानसिक तणावातून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले. एका महिलेला पाहून अश्लील चाळे केल्याचा साबळे यांच्यावर आरोप करण्यात आला होता. या प्रकरणी महिलेने त्यांच्या विरोधात तक्रार दिल्याने पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा नोंदवला. अटकेच्या भीतीपोटी ते हिंगोली येथे गावाला गेले. तेथून मुंबईत परततांना आपली अपकीर्ती होईल, या भीतीने त्यांनी आत्महत्या केली. साबळेंच्या पत्नीच्या तक्रारीनुसार रसिला चौहान, तिचा पती महेंद्र चौहान, संतोष चौहान, अंतेश चौहान, तसेच किरण लांडगे यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.