येरवडा (पुणे) येथील तारकेश्वर मंदिरातील दानपेट्या फोडणार्यांना अटक !
पुणे – येरवडा येथील ऐतिहासिक पांडवकालीन तारकेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून त्यातील रक्कम चोरणार्या २ जणांना येरवडा पोलिसांनी अटक केली आहे. स्वरूप चोपडे आणि अथर्व वाटकर अशी आरोपींची नावे आहेत. ही घटना ४ जूनला मध्यरात्री घडली होती. या प्रकरणी सुधीर बांबुरे यांनी तक्रार प्रविष्ट केली होती. त्यांचे साथीदार राजन पटेल, अक्षय साहू, अमित शेरीया यांच्यासह २ पकडलेल्या आरोपींच्या नावे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
अटकेतील आरोपींकडून १ लाख ५ सहस्र रुपये रोख रक्कम आणि गुन्ह्यात वापरलेली ४० सहस्र रुपयांची दुचाकी असा मुद्देमाल जप्त केला आहे. चोरांनी मंदिरातील ६ दानपेट्या फोडून त्यातील अनुमाने २ लाख रुपयांची रक्कम चोरून नेली होती.
संपादकीय भूमिका
मंदिरात चोर्या होणारच नाहीत, एवढा धाक पोलिसांनी निर्माण करणे आवश्यक ! |