भगवतचिंतनाने, नामाने देवाची आवश्यकता वाटू लागते !
मला आज देवाची आवश्यकता अशी वाटत नाही हे खरे; पण ती कशी वाटेल, याचा तरी आपण विचार करावा. भगवतचिंतनाने, नामाने ही आवश्यकता भासू लागते. इतकी आवश्यकता भासली पाहिजे की, अन्नपाणीसुद्धा गोड लागू नये. जितकी आग जोराची तितका पाण्याचा मारा अधिक हवा, तसे जितकी देहबुद्धी बळकट तितका नामाचा जोर अधिक पाहिजे. नामात प्रेम नाही; म्हणून ते घेण्याचे सोडू नये. नामात प्रेम वाटत नसले, तरी ‘नामात प्रेम आहे’, असे नित्य म्हणावे. नाम भावयुक्त अंतःकरणाने घ्यावे.
– ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज
( साभार : पू. प्रा. के.व्ही. बेलसरे – आध्यात्मिक साहित्य फेसबुक)