दानाच्या योगाने घेणारा नव्हे, तर देणाराच धन्य होत असतो !
स्वामी विवेकानंद यांची शिकवण
दोन पैसे हातात घेऊन आणि स्वतःला मोठे समजून एखाद्या भिकार्याला म्हणू नका, ‘अरे भिकार्या, घे दोन पैसे.’ उलटपक्षी तुमच्यासमोर तो गरीब माणूस उभा आहे, याविषयी कृतज्ञता बाळगा; कारण त्याला दान दिल्याने स्वतःचीच उन्नती आणि स्वतःचाच विकास करून घेण्याची संधी तुम्हाला प्राप्त झालेली असते. दानाच्या योगाने घेणारा नव्हे, तर देणाराच धन्य होत असतो.
(साभार : ‘स्वामी विवेकानंद म्हणतात’, रामकृष्ण मठ, नागपूर.)