मुंबईतील महाराष्ट्र शासनाच्या ‘इस्माईल युसुफ कॉलेज’ची जागा वक्फ मंडळाची झाल्याचा मुसलमानांचा दावा !
मुसलमानांनी सरकारी कर्मचार्यांना हुसकावले !
मुंबई – जोगेश्वरी येथील महाराष्ट्र शासनाच्या ईस्माईल युसूफ महाविद्यालयाची जागा वक्फ मंडळाची झाल्याचा दावा स्थानिक मुसलमानांनी केला आहे. येथे बांधकामासाठी आलेल्या सरकारी कर्मचार्यांशी अत्यंत आक्रमकपणे अरेरावी करत स्थानिक मुसलमानांनी त्यांना हुसकावून लावले. याविषयीचा व्हिडिओ प्रसारमाध्यमांवरून प्रसारित झाला आहे.
ईस्माईल युसूफ महाविद्यालयाची स्थापना वर्ष १९३० मध्ये मुंबईत झाली. या महाविद्यालयाचे प्रशासकीय कामकाज महाराष्ट्र शासनाच्या नियंत्रणाखाली चालवले जाते. याविषयी सामाजिक माध्यमांवरून प्रसारित झालेल्या व्हिडिओमध्ये येथे कामासाठी आलेल्या व्यक्तीला स्थानिक मुसलमानांनी घेरले होते. यामध्ये ‘ही भूमी जिल्हाधिकारी आणि सरकार यांच्या बापाची नाही. ही भूमी आमच्या पूर्वजांची आहे. वक्फ मंडळाच्या या भूमीवर तुम्ही काम करू शकत नाही’, अशा प्रकारे मुसलमान हुज्जत घालतांना दिसत आहेत. या वेळी काही मुसलमानांनी कामासाठी आलेली साम्रगी कह्यात घेण्याचे आवाहन केल्याचे व्हिडिओमध्ये दिसून येत आहे.
संपादकीय भूमिका
|