तळमळीने विज्ञापने मिळवण्याची सेवा करणार्या श्रीमती स्मिता नवलकर !
उद्या श्रावण शुक्ल दशमी (१५.८.२०२४) या दिवशी श्रीमती स्मिता नवलकर (आध्यात्मिक पातळी ६० टक्के) यांचा ७३ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.
श्रीमती स्मिता नवलकर यांना ७३ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराकडून नमस्कार !
१. गुजराती भाषेतील पंचांगासाठी विज्ञापने मिळवण्याकरता श्रीमती स्मिता नवलकर यांनी गुजरात येथे जाऊन प्रयत्न करणे
‘सनातन संस्था प्रकाशित करत असलेल्या गुजराती भाषेतील पंचांगासाठी विज्ञापने मिळवण्याकरता ६० टक्के आध्यात्मिक पातळी असलेल्या श्रीमती स्मिता नवलकर (वय ७३ वर्षे) मुंबईहून गुजरात येथे गेल्या. त्यांनी ‘विज्ञापने मिळवण्यासाठी कुणाकडे जायचे ?’, याचे नियोजन केले. गुजरात येथील श्री. हर्षकाकांच्या ओळखीने एका आस्थापनाच्या संचालकांना (डायरेक्टरना) संपर्क केला. त्यांना सनातनचे पंचांग पुष्कळ आवडले. त्यांनी पुष्कळ विज्ञापने दिली, तसेच कर्मचार्यांना देण्यासाठी पंचांगांची मागणीही केली. त्यांनी संस्थेची सात्त्विक उत्पादनेही घेतली.
२. श्रीमती स्मिता नवलकर यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे गुजराती भाषेतील पंचागासाठी आवश्यक सर्व विज्ञापने मिळू लागणे
त्यांनी कर्णावती, बडोदा, सूरत आणि वापी येथील स्थानिक साधकांसमवेत पंचांगासाठी विज्ञापने मिळवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा आणखी विज्ञापने मिळाली. त्यामुळे सगळ्या साधकांचा आत्मविश्वास वाढला. प्रतिवर्षी ते विज्ञापने घेत आहेत आणि पंचांगांचे वितरणही करत आहेत. सगळ्या साधकांच्या तळमळीमुळे आता गुजराती पंचांगासाठी १०० टक्के विज्ञापने मिळत आहेत.
यातून ‘आपण सकारात्मक राहून प्रयत्न केल्यावर ईश्वर कसे साहाय्य करतो ?’, हे शिकायला मिळते.’
– श्रीमती पूर्णिमा प्रभु (वय ६४ वर्षे), बेंगळुरू, कर्नाटक
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |