बांगलादेशातील हिंदूंवरील वाढती आक्रमणे लक्षात घेऊन हिंदूंना सुरक्षा पुरवा ! – हिंदु जनजागृती समितीचे कोल्हापूर जिल्ह्यात ठिकठिकाणी निवेदन
कोल्हापूर – बांगलादेशात गेल्या काही दिवसांपासून आरक्षणाच्या विरोधात चालू असलेल्या आंदोलनाने प्रचंड हिंसक वळण घेतले आहे. या हिंसाचाराचे रूपांतर आता अराजकतेत झाले आहे. जाणीवपूर्वक हिंदूंना लक्ष्य करून त्यांच्या उघडपणे हत्या करणे, हिंदूंच्या घरांवर आक्रमणे करणे, हिंदूंची दुकाने लुटणे, हिंदूंच्या मंदिरांची तोडफोड करणे-आग लावणे, हिंदु महिलांवर बलात्कार करणे, आदी अत्याचार केले जात आहे. तरी बांगलादेशातील हिंदूंवरील वाढती आक्रमणे लक्षात घेता तेथील हिंदूंना सुरक्षित ठिकाणी हलवावे आणि त्यांना तातडीने सुरक्षा पुरवा, या मागणीचे पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्री यांच्या नावे असलेले निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने कोल्हापूर जिल्ह्यात ठिकठिकाणी देण्यात आले.
१. चंदगड येथे तहसीलदार राजेश चव्हाण यांना देण्यात आले. या प्रसंगी वारकरी संप्रदायाचे ह.भ.प. विश्वनाथ महाराज पाटील, श्रीराम सेना आणि हिंदुराष्ट्र सेना तालुकाध्यक्ष श्री. महांतेश देसाई, तालुका उपाध्यक्ष श्री. तुकाराम मरगाळे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. दयानंद पाटील यांसह अन्य कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
२. हुपरी येथे नगर परिषदेत प्रशांत तराळ यांना, तर हुपरी पोलीस ठाण्यात साहाय्यक पोलीस निरीक्षक एन्.आर्. चौखंडे यांना देण्यात आले. हुपरी येथे निवेदन देतांना हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे श्री. नितीन काकडे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपशहरप्रमुख श्री. ऋषिकेश साळी, बजरंग दलाचे सर्वश्री गौरव नेमिष्टे, प्रशांत साळोखे, प्रताप भोसले, सुनील पाटील, हिंदुत्वनिष्ठ सर्वश्री ऋषिकेश दिवाण, सुनील दळवे, संतोष पाटील, अमोल तोडकर, धनाजी घाटगे, संदीप डोंगळे, रणजित नाईक, दीपक गजरे, अनिल मुडे, संदीप निकम, विक्रम सावंत, मोहन कांबळे, शुभंम हांडे, इंद्रजित पाटील, किरण कुंभार, संदीप कुलकर्णी, अरूण गायकवाड, संजय लोहार, सचिन माळी, विजय जाधव, महेश उलपे, बाबासो कुंभार उपस्थित होते.
३. पेठवडगाव येथे पोलीस निरीक्षक विलास भोसले यांना, तर नगर परिषद येथे मुख्याधिकारी सुमित जाधव यांना देण्यात आले. या प्रसंगी हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे श्री. नितीन काकडे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे श्री. विजय गुरव, भाजप शहरप्रमुख श्री. जगन्नाथ माने, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी श्री. राजेंद्र बुरुड, हिंदु जनजागृती समितीचे श्री. संतोष सणगर उपस्थित होते.
४. निपाणी (कर्नाटक) येथे उपतहसीलदार मृत्युंजय डंगी यांना निवेदन देण्यात आले. या प्रसंगी ‘श्रीराम सेना कर्नाटक’चे श्री. अमोल चेंडके, ‘सद्गुरु त्वायक्वांदो स्पोर्टस् अकॅडमी’चे श्री. बबन निर्मळे, श्रीराम सेना हिंदुस्थानचे सर्वश्री श्रीनिवास चव्हाण, दीपक खापे, ओंकार पोतदार, ‘विठ्ठलदेव फाऊंडेशन’चे सर्वश्री पांडुरंग मोरे, पांडुरंग मगदूम, रामचंद्र पोतदार, अभिनंदन भोसले, संजय कमते, विठोबा भजनी मंडळाचे श्री. पांडुरंग मोरे, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी सर्वश्री संजय मुसळे, राजू शिंदे, राजेश आवटे, हिंदवी स्वराज्य संघटनेचे श्री. युवराज मोरे. डॉ. चंद्रशेखर खोत, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे श्री. अजित पाटील, सनातन संस्थेचे श्री. अविनाश पवार आणि श्री. दिलीप काळभर ‘माऊली मंडळा’चे श्री. सागर केसरकर, बजरंग दलाचे श्री. अजित पारळे, ‘पतंजली’चे योग शिक्षक श्री. जे.डी. शिंदे, ‘इस्कॉन’चे सर्वश्री रवी रेडेकर, अशोक सुतार, अरुण सुतार, हिंदुत्वनिष्ठ श्री. योगेश पोतदार, धर्मप्रेमी श्री. उमेश आंबले, निवृत्त सुभेदार श्री. युवराज हवालदार, ‘गुरुकुल अॅकॅडमी’चे संस्थापक श्री. चारुदत्त पावले, हिंदु जनजागृती समितीचे श्री. अनिल बुडके आणि श्री. योगेश चौगुले यांसह हिंदुत्वनिष्ठ मोठ्या संख्येने उपस्थित होते.