Kannauj Minor Rape Case : कन्नौज (उत्तरप्रदेश) येथे समाजवादी पक्षाच्या नेत्याकडून अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा प्रयत्न !
कन्नौज (उत्तरप्रदेश) – येथील समाजवादी पक्षाचा नेता नवाबसिंह यादव (५० वर्षे) याला पोलिसांनी अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणी अटक केली. पीडित १५ वर्षीय मुलगी तिच्या मावशीसह यादव चालवत असलेल्या महाविद्यालयामध्ये नोकरी मागण्यासाठी गेली होती. मावशी शौचालयात गेल्यावर यादव याने अल्पवयीन मुलीचे बलपूर्वक कपडे काढले आणि तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला.
अल्पवयीन मुलीला नोकरी देण्याच्या नावाखाली बोलावले !
पोलिसांनी सांगितले की, यादव याने नोकरी देण्याच्या नावाखाली अल्पवयीन मुलगी आणि तिची मावशी यांना महाविद्यालयामध्ये बोलावले. रात्री उशिरापर्यंत दोघांना महाविद्यालयात बसवून ठेवले. महाविद्यालयातच त्याने मुलीवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात बाहेर गेलेल्या मावशी खोलीत आल्या. मावशीच्या सांगण्यावरून अल्पवयीन मुलीने ११२ वर पोलिसांना संपर्क केला. पोलिसांनी महाविद्यालय गाठले. आरोपीला आक्षेपार्ह अवस्थेत पकडण्यात आले. पोलिसांनी आरोपीला न्यायालयात उपस्थित केले असता त्याची रवानगी कारागृहात करण्यात आली आहे. या प्रकरणी पुढील अन्वेषण चालू आहे.
लोकसभा निवडणुकीच्या वेळी यादव हा काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि समाजवादी पक्षाचे वरिष्ठ नेते अखिलेश यादव यांच्यासोबत मंचावर असल्याचे छायाचित्रही समोर आले आहे. (यावरून यादव याच्या सुटकेसाठी राजकीय हस्तक्षेप झाल्यास आश्चर्य वाटणार नाही ! – संपादक)
संपादकीय भूमिकावासनांध नेत्यांचा भरणा असलेला समाजवादी पक्ष ! या नेत्यावर पक्षाचे वरिष्ठ काय कारवाई करणार ? |