Munawar Faruqui Apologises : हिंदुद्वेषी विनोदी कलाकार मुनव्वर फारुकी याची क्षमायाचना !
|
मुंबई – विनोदी कलाकार मुनव्वर फारुकी याने त्याच्या एका कार्यक्रमात, ‘कोकणी लोक इतरांना मूर्ख बनवतात’, अशा आशयाचे वक्तव्य केले होते; पण त्यानंतर मराठी आणि कोकणी लोक यांनी केलेल्या मोठ्या विरोधानंतर त्याला क्षमा मागावी लागली.
कोकणावर खूप खूप प्रेम आणि माझी माफी❤️ pic.twitter.com/pUSPYuZ9Kf
— munawar faruqui (@munawar0018) August 12, 2024
तो म्हणाला, ‘‘माझा कार्यक्रम विनोदी नव्हता. त्यात एकमेकांविषयी जाणून घेण्याचा विषय होता. तेव्हा कोकणाच्या संबंधात विषय निघाला. मी कोकणाविषयी काही विनोदी वाक्ये बोललो. त्यांची चेष्टा केली; पण माझा तसा हेतू नव्हता. मला कुठल्याही कोकणी माणसाला दुखायचे नव्हते; पण मी मनापासून तुम्हा सर्वांची माफी मागतो ! जय हिंद, जय महाराष्ट्र ।’’ (मुनव्वर फारुकीने केलेली ही सारवासारव न कळण्याइतका मराठी किंवा कोकणी माणूस काही दूधखुळा नव्हे ! – संपादक)
मुनव्वर फारुकी या हिरव्या सापाला मालवणी हिसका दाखवायला लागेल ! – नितेश राणे, आमदार, भाजप
भाजपचे आमदार नितेश राणे आक्रमक होत म्हणाले, ‘‘या फारुकी नावाच्या हिरव्या सापाला घरी जाऊन ‘कोकणातील लोक कसे असतात’, हे सांगावे लागेल. मुनव्वर फारुकी नावाचा हिरवा साप !
‘We need to teach this ‘green snake’ named Munawar Faruqui a lesson Malvani style ! – @NiteshNRane MLA, BJP
Regarding offensive joke made by Faruqui about Konkani peoplepic.twitter.com/uUVYklW3l4 https://t.co/hHCJqV5xKV
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) August 13, 2024
याची जीभ जरा जास्तच वळवळायला लागली. याला ‘स्टँडअप कॉमेडी’मध्ये कोकणातील माणसांची टिंगल उडवण्याची एवढीच खाज असेल, तर त्याच्या घरचा पत्ता आम्हालासुद्धा चांगल्या पद्धतीने माहिती आहे. त्याला मालवणी हिसका आता दाखवायला लागेल.’’
मुनव्वर फारुकी हा पाकिस्तानप्रेमी जिथे दिसेल, तिथे त्याला तुडवणार ! – सदा सरवणकर, आमदार, शिवसेना
शिवसेनेचे आमदार सदा सरवणकर ‘एक्स’वर म्हणाले, ‘‘जर मुनव्वर फारुकीने कोकणी माणसांची माफी मागितली नाही, तर हा पाकिस्तानप्रेमी मुनव्वर जिथे दिसेल, तिथे त्याला तुडवणार ! कोकणी माणूस कसा तुडवतो, हे याला समजू दे. याला जो तुडवेल, त्याला १ लाख रुपयांचे पारितोषिक देणार. ‘येवा कोकण आपलंच असा’, असे म्हणत स्वागत करणार्या कोकणी माणसांविषयी हे उपरे अशा पद्धतीची भाषा बोलतात.’’
जर ह्याने कोकणी माणसांची माफी नाही मागितली तर हा पाकिस्थान प्रेमी मुनावर जिथे दिसेल तिथे त्याला तुडवणार 😡 कोकणी माणूस कसा तुडवतो हे याला समजून दे 😡 याला जो तुडवेल त्याला एक लाखाचे बक्षीस 😡 येवो कोकण आपलंच असा 🙏
असे म्हणून स्वागत करणाऱ्या कोकणी माणसांबद्दल हे उपरे ही भाषा… pic.twitter.com/9u9XjDteL2— Samadhan Sarvankar (@samadhan234) August 12, 2024
संपादकीय भूमिकामुनव्वर फारुकी याने यापूर्वी अनेकदा हिंदु धर्म आणि देवता यांच्या विरोधात विधाने केल्याने त्याच्या विरोधात आंदोलने झाली आहेत. आता त्याने कोकणी माणसांविषयी आक्षेपार्ह विधान केले. पुढे तो आणखी काही तरी करण्यापूर्वीच त्याच्यावर गुन्हा नोंद करून त्याला आजन्म कारागृहात टाकण्याची शिक्षा केली पाहिजे ! |