Meat Fed To Students : मुख्‍याध्‍यापक महंमद इक्‍बाल यांनी विकलांग मुलाला माध्‍यान्‍ह भोजनात बलपूर्वक मांसाहार खाण्‍यास भाग पाडले !

  • मेरठ (उत्तरप्रदेश) येथील सरकारी शाळेमधील घटना

  • महंमद इक्‍बाल निलंबित

प्रातिनिधिक छायाचित्र

मेरठ (उत्तरप्रदेश) – येथे सरकारी शाळेमध्‍ये एका विद्यार्थ्‍याला मुख्‍याध्‍यापक महंमद इक्‍बाल यांनी माध्‍यान्‍ह भोजनात बलपूर्वक मांसाहार पदार्थ खाऊ घातल्‍याची घटना समोर आली आहे. हा मुलगा विकलांग आहे. या प्रकरणी महंमद इक्‍बाल यांना निलंबित करण्‍यात आले आहे.

१. या विद्यार्थ्‍याच्‍या भावाने तक्रारीत म्‍हटले आहे की, मुख्‍याध्‍यापक मला म्‍हणाले की, ‘आज भाजी चांगली नाही. त्‍यामुळे मांसाहारी पदार्थ मागवा.’ ‘मी मांसाहारी पदार्थ खाणार नाही’, असे मुख्‍याध्‍यापकांना सांगितले. तरीही त्‍यांनी मांसाहारीच पदार्थ मागवले आणि बलपूर्वक माझ्‍या भावाला खाऊ घातले. माझा मामा शाळेत आला आणि त्‍याने मुख्‍याध्‍यापकांना जाब विचारला. या प्रकरणी पोलिसांत तक्रार केल्‍यावर महंमद इक्‍बाल यांना पोलीस ठाण्‍यात बोलवण्‍यात आले.

२. यावर महंमद इक्‍बाल यांनी हे सगळे आरोप फेटाळले आहेत. ते म्‍हणाले की, मी काही माध्‍यान्‍ह भोजनात मांसाहारी पदार्थ मागवले नाहीत. जे विद्यार्थी माझ्‍यावर आळ घेत आहेत तेच विद्यार्थी मांसाहार घेऊन आले होते.

३. याविषयी शिक्षण विभागाच्‍या अधिकार्‍यांनी सांगितले की, शाळेत मांसाहारी पदार्थ कुणी मागवले, का मागवले ? याची आम्‍ही चौकशी करत आहोत. मांसाहारी पदार्थ मागवण्‍याचा उद्देश इतर मुलांना खाऊ घालणे, असा असू शकतो; मात्र शाळेत अशा पद्धतीने मांसाहारी पदार्थ मागवणे आणि जे खात नाहीत त्‍यांना ते खाऊ घालणे चुकीचे आहे. या प्रकरणी आम्‍ही शाळेचे मुख्‍याध्‍यापक महंमद इक्‍बाल यांना निलंबित केले आहे. आता पुढील चौकशी करत आहोत आणि संबंधित दोषी आढळल्‍यास कारवाईही केली जाईल.

संपादकीय भूमिका

अशांवर गुन्‍हा नोंद करून त्‍यांना कारागृहात टाकले पाहिजे !