सांबराची शिकार करणार्या ४ जणांना वन विभागाकडून अटक !
कोल्हापूर – गगनबावडा भागातील तिसंगी येथे ‘मीटर माळ’ परिसरात मादी जातीच्या गर्भवती असलेल्या सांबराची शिकार केल्यानंतर तिचे तुकडे करतांना तिघा संशयितांना गगनबावडा वन विभागाने पकडून कह्यात घेतले. या प्रकरणातील २ संशयित पसार झाले होते. कालांतराने त्यातील एक जण उपस्थित झाल्यावर एकूण ४ जणांना अटक करण्यात आली. अजून एक संशयित पसार असून त्याचा शोध चालू आहे. या सर्वांवर वन्यजीव कायद्याप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.