वडपे ते ठाणे दरम्यानच्या महामार्गाचे काम मे २०२५ पर्यंत पूर्ण होणार !
मुंबई – मुंबई-नाशिक महामार्गावरील वडपे ते ठाणे दरम्यानच्या महामार्गाच्या आठ पदरीकरण आणि काँक्रीटीकरणाचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एम्.एस्.आर्.डी.सी.) चालू आहे. मे २०२५ मध्ये ते पूर्ण होणार आहे, असे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे वडपे ते ठाणे दरम्यानच्या २३ कि.मी.च्या महामार्गाच्या वाहतूककोंडीला आणि खड्ड्यांना त्रासलेल्या प्रवाशांची आता यातून सुटका होईल, अशी त्यांना आशा आहे.
सध्या संपूर्ण महामार्गावर खड्डे असल्याने वाहतूककोंडीत आणखी वाढ होत असून प्रवाशांना आणि वाहनचालकांना येथे घंटोन्घंटे वाहतूककोंडीत अडकून रहावे लागत आहे.