बांगलादेशामध्ये होणार्या हिंदूंच्या क्रूर हत्यांचा निषेध !
युवा हिंदु प्रतिष्ठानकडून उपविभागीय अधिकार्यांना निवेदन
खामगाव (जिल्हा अमरावती) – बांगलादेशामध्ये हिंदूंच्या क्रूर आणि अमानुषपणे होणार्या हत्या अन् हिंदु महिलांवरील बलात्कार यांचा निषेध ९ ऑगस्ट या दिवशी युवा हिंदु प्रतिष्ठानच्या वतीने उपविभागीय अधिकार्यांना निवेदन देऊन निषेध करण्यात आला. या वेळी युवा हिंदु प्रतिष्ठानसह विविध संघटनांचे धर्मबंधू उपस्थित होते.
निवेदनात केलेल्या मागण्या
१. बांगलादेशामध्ये गेल्या काही दिवसांपासून खुलेआम हिदूंचा नरसंहार होत आहे, तेथील हिंदूंची मंदिरे तोडून देवतांची विटंबना होत आहे.
२. हिंदु आई-बहिणींवर बलात्कार करून त्यांच्या हत्या करण्यात येत आहे. यामुळे भारतातील हिंदूंची जनभावना दुखावून प्रचंड रोष व्यक्त होत आहे.
३. या पत्राद्वारे देशातील संरक्षणमंत्री, विदेशमंत्री, गृहमंत्री यांना विनंती आहे की, ज्याप्रमाणे तेथील माजी पंतप्रधान हसीना शेख यांना भारतात संरक्षण दिले, त्या पद्धतीने तेथील हिंदु समाजालाही संरक्षण देण्यात यावे.
४. जे बांगलादेशी मुसलमान भारतात अवैधरित्या रहातात, त्यांची तात्काळ हकालपट्टी करावी.
संपादकीय भूमिकाबांगलादेशामधील हिंदूंच्या संरक्षणासाठी केंद्र सरकारने ठोस पावले उचलावीत, हीच अपेक्षा ! |