बांगलादेशातील हिंदू आणि मंदिरे यांच्या रक्षणासाठी भारत सरकारने तातडीने पावले उचलावीत !
|
नागपूर, १२ ऑगस्ट (वार्ता.) – हिंदु जनजागृती समिती आणि समविचारी हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या वतीने येथील व्हेरायटी चौकात ‘हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलन’ घेण्यात आले. हिंदु जनजागृती समितीचे श्री. अभिजित पोलके यांनी बांगलादेशातील अराजकता आणि हिंदूंवर होणार्या अत्याचाराविषयी माहिती दिली. ते म्हणाले ‘‘बांगलादेशात जाणीवपूर्वक हिंदूंना लक्ष्य करून त्यांच्या उघडपणे हत्या करणे, घरे आणि दुकाने लुटणे, मंदिरांची तोडफोड करणे, आग लावणे, हिंदु महिलांवर बलात्कार करणे, हिंदूंना विस्थापित करणे आदी अत्याचार केले जात आहेत. या गोष्टींमुळे तेथील अल्पसंख्यांक हिंदूंमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण आहे.’’
या संदर्भात बांगलादेशी सैन्यदलाने दिलेल्या आश्वासनावर भारत सरकारने विसंबून न रहाता हिंदु समाजाच्या आणि मंदिरांच्या रक्षणासाठी तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी करण्यात आली. या विषयीचे निवेदन जिल्हाधिकार्यांना देण्यात येणार आहे.
बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराचा नागपूर येथील हिंदुत्वनिष्ठ संघटनाकडून तीव्र निषेध करण्यात आला. या वेळी चित्त पावन ब्राह्मण महासंघ, सर्व भाषिक परशुराम ब्राह्मण महासंघ, संती गणेश मंडळ, श्री दुर्गामंदिर हिल टॉप, श्रीराम मंदिर, सिद्धारुढ शिव मंदिर, भारतीय सिंधू सभा, सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती इत्यादी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
संपादकीय भूमिकाबांगलादेशातील हिंदूंची सुरक्षा भारतातील घुसखोरांना हुसकावण्यात आहे, असे कुणाला वाटले, तर चूक ते काय ? |