ब्रह्मोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या वेळी नागपूर येथील साधकांना आलेल्या अनुभूती !
१. ‘ॐ नमो नारायणा’ हा नामजप अंतर्मनापर्यंत जात आहे’, असे वाटणे
‘परम पूज्य गुरुदेव रथात बसून दर्शन द्यायला निघाले असतांना त्यांच्या चेहर्यावरून त्यांना साधकांकडे पाहून गहिवरून आल्याचे स्पष्टपणे दिसत होते. त्यांच्यातील वात्सल्यभाव आणि प्रेम पाहून माझाही कृतज्ञताभाव जागृत झाला. ‘श्रीकृष्णाष्टकम् चालू झाले, तेव्हा संपूर्ण विश्व नारायणाचा जप करत आहे’, असे मला जाणवले. ‘ॐ नमो नारायणा’ हा नामजप माझ्या अंतर्मनापर्यंत जात आहे’, असे मला वाटत होते.’
– सौ. कुंदा प्रकाश डहाळे, नागपूर
२. कार्यक्रमाच्या वेळी सतत अष्टसात्त्विक भाव जागृत होणे
‘सकाळपासूनच माझे मन अतिशय शांत आणि सकारात्मक होते. घरातील स्वच्छता, शुद्धी आणि अन्य सर्वच कामे वेळेत पूर्ण झाली. मला घरात वेगळेच चैतन्य जाणवत होते. कार्यक्रम चालू असतांना सतत अष्टसात्त्विक भाव जागृत होऊन भावाश्रू दाटून येत होते. मन सतत अनुसंधानात होते. सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या चेहर्यावरचे भाव पाहून भावजागृती होत होती.’
– सौ. अंजली पाध्ये
३. कार्यक्रमाच्या वेळी परम पूज्य गुरुदेवांविषयी अतिशय उत्कट भाव दाटून येणे आणि ‘प्रत्येक साधकामध्ये मी आहे’, असे वाटणे
‘कार्यक्रमाच्या ठिकाणी परम पूज्य गुरुदेवांचे दर्शन होणार आहे’, असे विचार मनात येऊन भावाश्रू येत होते. त्या वेळी माझ्या मनात परम पूज्यांविषयी अतिशय उत्कट भाव दाटून आला होता. मी आणि माझे गुरुदेव एवढेच विश्व आहे, असे जाणवत होते. परम पूज्य गुरुदेवांचे रथ ओढणारे साधक, ध्वज हातात घेऊन चालणारे साधक, टाळ हातात घेऊन चालणार्या साधिका या सर्वांत मला माझे अस्तित्व जाणवत होते. ‘मी प्रत्यक्ष त्या कार्यक्रम स्थळी आहे’, असे मला वाटत होते. ‘नृत्य करणार्या साधिकांमध्ये मी आहे आणि तेथील प्रत्येक सेवेत मी सहभागी झाले आहे’, असे मला वाटत होते. एवढे मोठे भव्य-दिव्य नियोजन परम पूज्य गुरुदेवांच्या कृपेविना अशक्यच आहे. अशा या महत्कार्याच्या सिंधू रूपात भगवंताने मलाही बिंदू रूपात सहभागी करून घेतले आहे. याबद्दल गुरुदेवांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त होत होती.
– सौ. वैशाली महेश परांजपे
(सर्व सूत्रांचा दिनांक २९.५.२०२३)
|