Bhopal Protest : भोपाळ (मध्यप्रदेश) येथे १ सहस्र हिंदुत्वनिष्ठांनी केली मानवी साखळी !
बांगलादेशातील हिंदूंना लक्ष्य करण्यामागे ‘गझवा-ए-हिंद’ हाच उद्देश होय ! – विनोद यादव, ‘धर्मरक्षक’ संघटना
भोपाळ (मध्यप्रदेश) – बांगलादेशातील हिंदूंवर होणार्या अत्याचारांच्या विरोधात येथील व्ही.आय.पी. मार्गावर हिंदु संघटनांकडून निदर्शने करण्यात आली. यात १ सहस्रहून अधिक हिंदुत्वनिष्ठांनी मानवी साखळी केली होती. सहभागी झालेल्या हिंदूंच्या हातात निषेधाचे फलक होते. त्यांनी हिंदूंच्या संरक्षणाची मागणी केली. ‘धर्मरक्षक’ संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या आंदोलनात ‘धर्मरक्षक’ संघटना, विश्व हिंदु परिषद आदी संघटनांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. आंदोलनानंतर हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी बांगलादेशी हिंदूंच्या रक्षणार्थ विविध मागण्यांचे निवेदनही सरकारी अधिकार्यांकडे सुपूर्द केले.
Hindu youth in thousands gathered in Bhopal today and gave a clarion call to #SaveBangladeshiHindus.@Vinodyadav7_ and his devout Hindu team of #Dharmarakshak sangathan had organized a protest in the Madhya Pradesh capital.
Every Hindu from Bharat needs to unite for Bangladeshi… pic.twitter.com/C1w4Ox3qs7
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) August 11, 2024
‘धर्मरक्षक’ संस्थेचे अध्यक्ष श्री. विनोद यादव म्हणाले की, आज जगभरातील हिंदूंना लक्ष्य करण्यात येत आहे. या सगळ्यामागील उद्देश हा हिंदूंचा नरसंहार करून ‘गझवा-ए-हिंद’ (भारताचे इस्लामीकरण) करणे, हेच होय.