Russia Ukraine War : युक्रेनचे सैन्य रशियात ३० किलोमीटर आतपर्यंत घुसले
कीव (युक्रेन) – युक्रेन आणि रशिया यांच्यात गेल्या २ वर्षांपासून युद्ध चालू असतांना प्रथमच युक्रेनचे सैन्य रशियाच्या सीमेमध्ये ३० किलोमीटर आतपर्यंत घुसले आहे. रशियाने सीमेवरील २५० चौरस किलोमीटरचा प्रदेश गमावला आहे. युक्रेनच्या सैन्याचे पुढील लक्ष्य रशियाचे सुदजा शहर आहे. सामाजिक माध्यमांतून युक्रेनचे सैन्य रशियामध्ये घुसल्याचे व्हिडिओज प्रसारित झाले आहेत. यात युक्रेनचे सैनिक इमारतींवरील रशियाचा ध्वज काढून त्याजागी त्यांच्या देशाचा ध्वज लावत आहेत.
रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या मारिया झाखारोवा यांनी सांगितले की, रशियाच्या सैन्याकडून चोख प्रत्युत्तर दिले जाईल. ज्या भागात ही लढाई चालू आहे तो भाग कुर्स्क न्यूक्लियर प्लांटजवळ आहे. हा पॉवर प्लांट रशियामधील सर्वांत मोठ्या अणू प्रकल्पांपैकी एक आहे.