साधिकेने तिच्या आईच्या गुडघ्याच्या शस्त्रकर्माच्या कालावधीत अनुभवलेली गुरुकृपा !
‘माझी आईच्या (श्रीमती मिथिलेश वेद यांच्या) गुडघ्यावर पुणे येथील रुग्णालयात शस्त्रकर्म झाले. तेव्हा मला जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.
१. आईला ‘तिच्या गुडघ्याची वाटी बदलण्याचे शस्त्रकर्म (नी रिप्लेसमेंट सर्जरी) यशस्वी होईल कि नाही’, या विचाराने भीती वाटून ताण आला होता; पण संतांवर श्रद्धा ठेवून ती शस्त्रकर्म करून घेण्यास सिद्ध झाली.
२. गुरुकृपेने आईला रुग्णालयात चांगल्या सुविधा मिळणे
आईचे शस्त्रकर्म झाल्यानंतर आईला जी खोली देण्यात येणार होती, त्या खोलीत विशेष सुविधा नव्हत्या. प्रसाधनगृह काही अंतरावर होते; मात्र आईला अतीदक्षता विभागातून बाहेर आणल्यावर जी खोली देण्यात आली, त्या खोलीतील रुग्णाला एक दिवस आधीच घरी जाण्याची अनुमती मिळाली. त्या खोलीत आवश्यक त्या सर्व सुविधा होत्या.
३. पू. (सौ.) मनीषा पाठक यांची अनुभवलेली प्रीती
पुणे येथील पू. (सौ.) मनीषा पाठक (सनातनच्या १२३ व्या (समष्टी) संत, वय ४२ वर्षे) यांनी आमची सर्वतोपरी काळजी घेतली. त्या परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ८२ व्या जन्मोत्सवानिमित्त काढण्यात येणार्या दिंडीच्या संबंधित महत्त्वाच्या सेवेत व्यस्त होत्या, तरीही त्यांनी वेळोवेळी भ्रमणभाष करून आईच्या प्रकृतीविषयी विचारपूस केली. त्यांनी आमची साधकांच्या घरी रहाण्याची आणि जेवणाची चांगली सोय केली. पुणे येथील साधकांनी आईला रुग्णालयात अल्पाहार आणि जेवण दिले. आईचे शस्त्रकर्म झाल्यानंतर तिला रुग्णालयातील जेवण जात नव्हते; मात्र ती साधकांनी बनवलेला प्रसाद ग्रहण करू शकली. पू. मनीषाताईंनी आईला प्रसाद पाठवला.
४. आईला शस्त्रकर्मानंतर १५ दिवस पुणे येथे रहावे लागले. तेव्हा आम्ही सनातन परिवाराचे प्रेम अनुभवले.
५. गुरु आणि साधक यांची प्रीती अनुभवणे
आईच्या शस्त्रकर्माच्या वेळी आणि नंतर गुरुकृपेने सर्व व्यवस्थित झाले. आईला अनेक शारीरिक त्रास असल्यामुळे तिचे शस्त्रकर्म होणे अवघड होते; मात्र गुरुकृपेने सर्व सुरळीत झाले. त्या कालावधीत आम्ही गुरु (परात्पर गुरु डॉ. आठवले) आणि साधक यांची प्रीती अनुभवली.’
– सौ. क्षिप्रा प्रशांत जुवेकर (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के, वय ४० वर्षे), जळगाव (१४.६.२०२४)