कापूस आणि सोयाबीन यांना प्रतिहेक्टरी ५ सहस्र रुपये अर्थसाहाय्य देणार ! – धनंजय मुंडे, कृषीमंत्री
मुंबई – वर्ष २०२३ मध्ये खरीप काळात कापूस आणि सोयाबीन यांना अल्प दर प्राप्त झाल्यामुळे झालेल्या आर्थिक हानीसाठी राज्यशासनाकडून शेतकर्यांना अर्थसाहाय्य देण्यात येणार आहे. कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकर्यांना प्रतिहेक्टरी ५ सहस्र रुपये अर्थसाहाय्य दिले जाईल, अशी माहिती कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.
हे अर्थसाहाय्य २ हेक्टरपर्यंत, तसेच ज्यांनी ई-पीक पेर्यांची नोंदणी केलेली आहे, अशा शेतकर्यांना अर्थसाहाय्य दिले जाणार आहे. यासाठी पात्र शेतकर्यांनी आधारकार्ड आणि अधिकोषातील खाते यांच्याशी संलग्न माहिती, तसेच वैयक्तिक संमतीपत्र किंवा सामूहिक नाहरकत पत्र कृषी साहाय्यकाकडे जमा करावे; जेणेकरून लवकरात लवकर खात्यावर निधी वितरीत करता येईल, असे आवाहन धनंजय मुंडे यांनी केले आहे.