पुणे येथे किरकोळ कारणांवरून पोलीस कर्मचार्यास शिवीगाळ
पुणे – किरकोळ कारणांवरून ५ जणांनी पोलीस कर्मचार्याला शिवीगाळ करत मारहाण केल्याची घटना विश्रांतवाडीतील धानोरी भागात घडली. या प्रकरणी पोलीस कर्मचारी धवल लोणकर यांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट (दाखल) केली आहे. विजय केंजळे, सूर्यकांत केंजळे, विशाल केंजळे, चंद्रकांत केंजळे आणि निमेश जगताप अशी आरोपींची नावे आहेत.
लोणकर हे विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. ते कुटुंबियांसोबत मोटारीतून घरी जात असतांना भैरवनगर भागातील १० क्रमांकाच्या रस्त्यावर त्यांची गाडी अडवून शिवीगाळ करण्यात आली. त्यातील एका आरोपीने चेहर्यावर वार केला, अशी माहिती तक्रारीमध्ये नमूद करण्यात आली आहे.
संपादकीय भूमिकापोलीसच इतरांकडून मार खात असतील, तर त्यांचे प्रशिक्षण नीट झाले नाही, असे समजायचे का ? |