२५ हून अधिक महिलांना अश्लील व्हिडिओ पाठवणार्या वासनांध महंमद खानला मुंबईतून अटक !
मुंबई – २५ हून अधिक महिलांना अश्लील व्हिडिओ पाठवणार्या वासनांध महंमद अजीज महंमद निसार खान (वय ३६ वर्षे) याला पोलिसांनी वांद्रेमधील बेहरामपाडा येथून अटक केले. वांद्रे (पूर्व) येथील एका महिलेने केलेल्या तक्रारीवरून अटक झाल्यावर महंमद याने अन्यही महिलांना अश्लील व्हिडिओ पाठवल्याचा प्रकार उघड झाला. या प्रकरणी निर्मलनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
१४ जून या दिवशी वांद्रे (पूर्व) येथील एका महिलेशी अनोळखी दूरभाष क्रमांकावरून एक व्यक्ती अश्लील संभाषण करू लागली. असे वारंवार झाल्यावर महिलेने याविषयी पतीला सांगितले. त्यानंतर या दांपत्याने निर्मलनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी सायबर विभागाच्या साहाय्याने या व्यक्तीचा शोध घेतला असता महंमद हे प्रकार करत असल्याचे उघड झाले. महंमद मूळचा उत्तरप्रदेश येथील असून तो विवाहित आहे. त्याला २ मुले आहेत. बेहरामपाडा येथे तो पानाचा ठेला चालवत होता. पोलीस अन्वेषणात ही माहिती उघड झाली.
संपादकीय भूमिकामहिलांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी अशा वासनांधांना कठोर शिक्षा व्हायला हवी ! |