अधिछात्रवृत्ती मिळण्यासाठी विद्यार्थ्याचा पेट्रोल अंगावर ओतून आत्मदहनाचा प्रयत्न
पुणे येथे ‘बार्टी’ कार्यालयासमोर विद्यार्थ्यांचे आमरण उपोेषण चालू !
(अधिछात्रवृत्ती (फेलोशीप) म्हणजे पी.एच्.डीसारखे उच्च शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीच्या रकमेसह मिळणार्या काही सुविधा)
पुणे – उच्च शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांना गेली अडीच वर्षे अधिछात्रवृत्ती (फेलोशीप) मिळाली नाही. त्या विरोधात ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्थे’च्या (बार्टी) कार्यालयाबाहेर उपोषणाला बसलेल्या एका विद्यार्थ्याने अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. पोलीस आणि अन्य विद्यार्थ्यांनी त्याला वेळीच रोखल्यामुळे कोणतीही दुर्घटना घडली नाही.
विद्यार्थी ‘संशोधक विद्यार्थी संघर्ष कृती समिती’च्या वतीने ५ ऑगस्टपासून आमरण उपोेषण चालू आहे. वर्ष २०२२ पासून कोणत्याही विद्यार्थ्याला ही रक्कम मिळाली नाही, असे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. त्यातच २५ जुलै २०२४ या दिवशी एक निर्णय प्रसिद्ध करून सरकारने ‘बार्टी’, ‘सारथी’ आणि ‘महाज्योती’ या संस्थांच्या विद्यार्थ्यांना ५० टक्केच अधिछात्रवृत्ती देण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे.