नवी मुंबईत पकडलेले ५२ कोटी रुपयांचे अमली पदार्थ ‘एन्.सी.बी.’कडून नष्ट !

प्रतिकात्मक छायाचित्र

मुंबई – मागील काही वर्षांत नवी मुंबई परिसरातून कह्यात घेतलेले ५ सहस्र ४८५ किलो अमली पदार्थ अमली पदार्थविरोधी पथकाने (नार्काेटिक्स कंट्रोल ब्युरो) नष्ट केले. आंतरराष्ट्रीय बाजारातील दरानुसार या अमली पदार्थांचे मूल्य ५२ कोटी रुपये इतके होते.

अमली पदार्थ नष्ट करण्याची ही प्रक्रिया ८ आणि ९ ऑगस्ट या दिवशी तळोजा येथे पार पडली. या अमली पदार्थांच्या तस्करीमध्ये परदेशी नागरिकांसह अनेकांना अटक करण्यात आली आहे. सर्वाेच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार हे उच्च दर्जाचे अमली पदार्थ नष्ट करण्यासाठी विशेष समितीची स्थापना करण्यात आली होती.