दान हा श्रेष्ठ गुण !
स्वामी विवेकानंद यांची शिकवण !
दानाहून अधिक श्रेष्ठ असा गुण नाही. जो आपले हात दुसर्याकडून काहीतरी घेण्यासाठी पसरतो, तो सर्वांत खालच्या प्रतीचा माणूस होय आणि ज्याचे हात देण्यासाठी पुढे होतात, तो माणूस सर्वश्रेष्ठ कोटीचा होय. हात हे सर्वदा देण्यासाठीच निर्मिलेले आहेत. जरी तुम्ही भुकेने मरत असाल, तरी तुमच्याजवळ असलेला भाकरीचा शेवटचा तुकडा दुसर्याला द्या. आपल्या जवळचे अन्न दुसर्याला देऊन तुम्ही स्वतः भुकेने मेला, तर त्याच क्षणी तुम्ही मुक्त होऊन जाल. त्याच क्षणी तुम्ही पूर्ण होऊन जाल. ईश्वर होऊन जाल.
(साभार : ‘स्वामी विवेकानंद म्हणतात’, रामकृष्ण मठ, नागपूर.)