Karnataka Hindus Attack : गाडीविषयी प्रश्न विचारल्यामुळे मुसलमानांकडून हिंदु युवकांवर आक्रमण !
कलबुर्गी (कर्नाटक) – रस्त्याच्या मध्यभागी ट्रक उभा केल्यावरून प्रश्न विचारल्यामुळे मेहबूब, सय्यद, सलमान आणि शेख यांनी २ हिंदु युवक रघु रेड्डी आणि राहुल रेड्डी यांच्यावर आक्रमण केल्याची घटना शहरातील कोडला क्रॉसजवळ घडली आहे.
१. रघु रेड्डी आणि राहुल रेड्डी येथे गॅरेज चालवतात. मेहबूब पटेल याने रस्त्याच्या मध्यभागी ट्रक उभा केला होता. राहुल रेड्डी दुचाकीवरून जात असतांना ट्रकला धडकून खाली पडले. त्यानंतर राहुल रेड्डी यांनी मेहबूब पटेलला विचारले की, ‘तू ट्रक रस्त्याच्या मध्यभागी का उभा केला आहेस?’ यावर मेहबूब पटेलने राहुल रेड्डीशी हुज्जत घातले. त्याला अपशब्द वापरले आणि शिवीगाळ चालू केली.
२. याविषयी माहिती मिळताच राहुल रेड्डी यांचा भाऊ रघु रेड्डी घटनास्थळी पोचले. नंतर मेहबूब पटेल आणि त्याचे मित्र सय्यद सुल्तान, सलमान पटेल, शेख समीर यांनी अचानक दोघा हिंदु युवकांवर आक्रमण केले. गंभीररित्या घायाळ झालेले रघु रेड्डी यांना कलबुर्गी येथील रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.
संपादकीय भूमिकामुसलमानांची झुंडशाही ! |