कर्नाटकातील ५ बांगलादेशी निर्वासित हिंदूंना नागरिकत्व सुधारणा कायद्याद्वारे देण्यात आले भारतीय नागरिकत्व !
रायचूर (कर्नाटक) – येथील आर्.एच्. कॅम्पमध्ये अनुमाने २० सहस्र बांगलादेशी स्थलांतरित आहेत. त्यांच्या पूर्वजांनी पिढ्यान्पिढ्या आधी बांगलादेशातून कर्नाटकात स्थलांतर केले होते आणि सध्या ते रायचूरमध्ये रहातात. यातील ५ जणांना नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या (सी.ए.ए.च्या) अंतर्गत भारतीय नागरिकत्व देण्यात आले आहे. सी.ए.ए. अंतर्गत नागरिकत्व मिळाल्याचे राज्यातील हे पहिले प्रकरण आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रायचूरला भेट दिली होती, तेव्हा भाजपचे माजी खासदार विरुपाक्षप्पा यांच्या माध्यमातून निर्वासितांनी भारतीय नागरिकत्वासाठी विनंती केली होती आणि त्यांच्या अडचणी मांडल्या होत्या. त्यानंतर आता त्यांना नागरिकत्व देण्यात आले आहे. रामकृष्ण अभिकरी, सुकुमार मोंडल, बिप्रवास, जयंत मोंडल आणि अद्वित अशी त्यांची नावे आहेत.