Railway Served NonVeg In Veg-Thali : रेल्‍वेमध्‍ये प्रवाशाला मागणीनुसार शाकाहाराऐवजी मांसाहार दिल्‍याची घटना !

  • मांसाहार मुसलमानाच्‍या उपाहारगृहातून पाठवण्‍यात आल्‍याचे उघड

  • रेल्‍वेने कारवाई करण्‍याऐवजी केवळ चेतावणी दिली  

नवी दिल्ली – नवी देहली रेल्‍वे जंक्‍शनमध्‍ये थांबलेल्‍या रेल्‍वेमध्‍ये एका हिंदु प्रवाशाच्‍या धार्मिक भावना दुखावल्‍याची घटना समोर आली आहे. पल्लव सिंह नावाच्‍या  प्रवाशाने श्रावण मास चालू असल्‍याने शाकाहारी स्‍पेशल थाळीची ऑनलाईन ऑर्डर दिली; पण त्‍याला ‘शाकाहारी स्‍पेशल थाळी’ असा स्‍टिकर लावण्‍यात आलेल्‍या डब्‍यातून मांसाहार देण्‍यात आला. त्‍यानंतर या प्रवाशाने रेल्‍वेकडे ऑनलाईन तक्रार नोंदवली आहे. या प्रकरणी उपाहारगृहाच्‍या मालकाचे नाव फैज आहे, तर जेवण पोचवणार्‍या व्‍यक्‍तीचे नाव शहाबुद्दीन कुरेशी आहे. ‘रेल्‍वेने या दोघांवर कोणतीही कारवाई न करता त्‍यांना केवळ चेतावणी दिली’, असे या प्रवाशाने सांगितले.

भारतीय रेल्‍वेने सांगितले की, खाद्यपदार्थातील विसंगतीसाठी संपूर्ण रक्‍कम परत करण्‍यात आली आहे. योग्‍य ती कारवाईही करण्‍यात आली असून विक्रेत्‍यांनी खाद्यपदार्थ पॅकिंग करतांना अधिक सावध रहावे आणि भविष्‍यात अशा तक्रारी करू नयेत अन्‍यथा कठोर कारवाई करण्‍यात येईल, अशी चेतावणी देण्‍यात आली आहे.

हिंदूंना शाकाहारऐवजी मांसाहार देण्‍यात आल्‍याच्‍या काही घटना

अ. ४ ऑगस्‍ट २०२४ या दिवशी हरिद्वारहून कांधला मार्गे गंगाजल घेऊन देहलीला परतणार्‍या यात्रेकरूंना एका उपाहारगृहात शाकाहारऐवजी मांसाहारी बिर्याणी देण्‍यात आली. याप्रकरणी तन्‍वीर नावाच्‍या आरोपीला पकडून पोलिसांत देण्‍यात आले.

आ. एप्रिल २०२४ मध्‍ये गुजरात पोलिसांनी वडोदरास्‍थित सामोसा दुकान ‘हुसेनी समोसा सेंटर’वर छापा टाकला आणि गोमांस भरलेले समोसे विकल्‍याबद्दल सेंटरचा मालक युसूफ आणि नईम शेख यांच्‍यासह ६ जणांना अटक केली.

इ. पुणे येथील टाटा मोटर्सच्‍या कॅन्‍टीनमध्‍ये निरोध, दगड आणि तंबाखू यांनी भरलेले समोसे सापडले. या प्रकरणी पोलिसांनी रहीम शेख, अझर शेख, मजार शेख, अझर शेख आणि विकी शेख यांच्‍याविरोधात गुन्‍हा नोंदवला.

ई. जानेवारी २०२४ मध्‍ये जैन समाजातील एका शाकाहारी प्रवाशाला एअर इंडियाच्‍या विमानामध्‍ये शाकाहारी जेवणात चिकनचे तुकडे दिले गेले. संतापलेल्‍या महिलेने कर्मचार्‍यांकडे तक्रार केली; मात्र त्‍यावर कोणतीही कारवाई झाली नाही.

उ. जुलै २०२२ मध्‍ये देहलीच्‍या जामिया मिलिया इस्‍लामिया विद्यापिठातील कँटिनमध्‍ये एका शाकाहारी विद्यार्थ्‍याला मांसाहारी सँडविच देण्‍यात आले. त्‍याने कँटीन कर्मचार्‍यांकडे तक्रार केली असता विद्यार्थ्‍याला धक्‍काबुक्‍की करण्‍यात आली.

ऊ. डिसेंबर २०१८ मध्‍ये अलीगड मुस्‍लिम विश्‍वविद्यालयात मांसाहारी पदार्थ बनवण्‍यासाठी वापरल्‍या जाणार्‍या तेलात शिजवलेले शाकाहारी अन्‍न दिले जात असल्‍याचा आरोप करण्‍यात आला होता.

संपादकीय भूमिका

रेल्‍वेमध्‍ये अशा प्रकारच्‍या घटना घडल्‍यावर रेल्‍वे कारवाई का करत नाही ? रेल्‍वेतील अधिकार्‍यांचे आरोपींशी साटेलोटे असते का ?