Wayanad Landslides : पंतप्रधान मोदी यांनी वायनाडमधील भूस्खलन झालेल्या क्षेत्राची केली पहाणी !

वायनाडमधील भूस्खलनाची हेलीकॉप्टरद्वारे पाहणी करतांना पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री पिनाराई विजयन्

वायनाड (केरळ) : काही दिवसांपूर्वी जिल्ह्यातील काही गावांमध्ये झालेल्या भूस्खलनामुळे ३७० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. ही घटना ३० जुलैला घडली होती. यात शेकडो नागरिकही घायाळ झाले.

या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १० ऑगस्टला केरळच्या दौर्‍यात भूस्खनलन प्रभावित क्षेत्रांची हेलीकॉप्टरद्वारे पहाणी केली. तसेच रुग्णालयात उपचार घेत असलेल्या घायाळ नागरिकांनाही ते भेटले. या वेळी त्यांनी परिणाम झालेल्या गावकर्‍यांच्या पुनर्वसनाच्या परिस्थितीचाही आढावा घेतला. महत्त्वाचे म्हणजे या भेटीनंतर पंतप्रधान मोदी यांनी संबंधित अधिकार्‍यांची बैठक घेतली.