पुणे येथे ‘व्हॉट्सॲप’वर ‘ट्रिपल तलाक’ची नोटीस देणार्या पतीविरुद्ध गुन्हा नोंद !
पुणे – येथे ‘व्हॉट्सॲप’वर संदेश पाठवून पत्नीला ट्रीपल तलाकची नोटीस दिल्याच्या प्रकरणी पतीविरुद्ध कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. या प्रकरणी ३६ वर्षीय महिलेने कोंढवा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पती फिरोज अख्तर विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पती फिरोजने तक्रारदार महिलेला १४ जूनला पहिली नोटीस पाठवून तलाक देत असल्याचे सांगितले. एका महिन्याने दुसरा आणि त्यानंतर पुन्हा एका महिन्याने तिसरा तलाक देणार असल्याचे नोटिसीत म्हटले आहे. पतीने ही नोटीस ‘व्हॉट्सॲप’वर आणि पोस्टाने पाठवली आहे, असे महिलेने तक्रारीत म्हटले आहे.