लोहगाव (पुणे) परिसरात १ कोटीचे मॅफेड्रॉन जप्त !
पुणे पोलिसांची कारवाई
पुणे – पुणे पोलिसांच्या अमली पदार्थ विभागाने लोहगाव परिसरात धाड घालून १ कोटी रुपयांचे मॅफेड्रॉन जप्त केले आहे. लोहगाव येथील विघ्नहर्ता अपार्टमेंट परिसरात केलेल्या या कारवाईत पोलिसांनी श्रीनिवास संतोष गोदजे, रोहित शांताराम बेंडे आणि निमिष सुभाष अबनावे या तिघांना अटक केली. या प्रकरणी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अमली पदार्थांचा साठा असल्याची माहिती मिळाल्यानंतर अतिरिक्त पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे आणि उपायुक्त अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली अमली पदार्थ विरोधी पथकाने छापा टाकून १ कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले आहेत.