पतंग उडवण्यासाठी कृत्रिमरित्या सिद्ध करण्यात येणार्या धाग्यांवर गोव्यात बंदी
पणजी, १० ऑगस्ट (स.प.) – पंतग उडवण्यासाठी धारदार धागा वापरल्याने माणसे, प्राणी, तसेच विशेष करून पक्षी यांना गंभीर दुखापत होत असल्याने पतंग उडवण्यासाठी नॉयलॉन, प्लास्टिक किंवा इतर कृत्रिम पदार्थांपासून बनवलेल्या धाग्याची विक्री, उत्पादन, साठवणूक, पुरवठा आणि आयात करण्यास बंदी असल्याविषयीची अधिसूचना गोवा सरकारने जारी केली आहे. या अधिसूचनेनुसार चिनी धागा किंवा मांजा म्हटला जाणारा धागा किंवा काच, धातू किंवा इतर धारदार वस्तू वापरून धारदार करण्यात आलेला सुती धागा यांवर गोवा राज्यात बंदी असेल. केवळ साधा सुती धागा वापरून पतंग उडवण्यास अनुमती आहे.