यापुढे ‘शिधापत्रिका’ ही निवासस्थान किंवा ओळख यांविषयीचा पुरावा म्हणून ग्राह्य धरली जाणार नाही
सरकारची सूचना
पणजी, १० ऑगस्ट (वार्ता.) – सार्वजनिक वितरण प्रणाली (नियंत्रण) २०१५ नुसार दिलेल्या शिधापत्रिकेचा उपयोग निवासस्थान किंवा ओळख यांविषयीचा पुरावा म्हणून करण्यास ग्राह्य धरला जाणार नाही, अशी सूचना नागरी पुरवठा आणि ग्राहक व्यवहार खात्याकडून देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे या खात्याकडून दिलेल्या सूचनेमध्ये सर्व सरकारी खाती, महामंडळे, इतर सरकारी संस्था यांनी निवासस्थान किंवा ओळख यांविषयीचा पुरावा म्हणून शिधापत्रिका दाखवण्याचा आग्रह धरू नये, तसेच सरकारी योजना किंवा सरकारी सेवा यांच्या लाभासाठी पुरावा म्हणून शिधापत्रिकेची तरतूद काढून टाकावी, असे म्हटले आहे.