‘स्वतःच्या मुलांशी तत्त्वनिष्ठतेने कसे वागायला हवे ?’, याचा आदर्श आपल्या कृतीतून निर्माण करणारे सनातनचे ७५ वे संत पू. रमानंद गौडा !
१. ग्रंथासाठी कन्नड भाषांतराची सेवा करतांना पू. रमानंद गौडा यांच्या संदर्भातील एक प्रसंग आठवणे
‘मी ‘मुलांची बुद्धी आणि मन यांचा विकास करा’ या ग्रंथाचे कन्नड भाषांतर, तसेच पडताळणी यांची सेवा करत होते. त्या वेळी सनातनचे ७५ वे संत पू. रमानंद गौडा ‘आपल्या मुलांशी तत्त्वनिष्ठतेने कसे वागले होते’, याविषयीचा एक प्रसंग मला आठवला.
२. एका साधकाने पू. रमानंदअण्णांना त्यांच्या मुलांच्या वागणुकीविषयी सांगितल्यावर पू. अण्णांनी त्वरित दोन्ही मुलांना आश्रमातील कार्यपद्धत पाळण्याविषयी कठोरपणाने समजावणे
पू. रमानंदअण्णा आणि त्यांची २ मुले कर्नाटकातील मंगळुरू येथील आश्रमात रहातात. एकदा एका साधकाने पू. रमानंदअण्णांना त्यांच्या मुलांच्या वागणुकीविषयी सांगितले. त्या वेळी पू. अण्णांनी त्वरित दोन्ही मुलांना बोलावून घेतले आणि त्यांना कठोरपणाने सांगितले, ‘‘जर तुम्हाला साधना करण्यासाठी या आश्रमात रहायचे असेल, तर तुम्हाला येथील कार्यपद्धत पाळावीच लागेल. ‘आमची मुले’ म्हणून तुम्हाला कोणत्याही विशेष सवलती नाहीत. तुम्ही साधना करून पुढील वाटचाल केली, तरच गुरूंची कृपा होईल, अन्यथा स्वभावदोष वाढून तुम्हा दोघांना घरी जावे लागेल ! तुम्ही दोघे याविषयी ठरवू शकता. तुम्ही स्वभावदोषांकडे लक्ष न दिल्याने ते वाढले, तर मी तुम्हाला कोणतेही साहाय्य करू शकणार नाही. हा आश्रम, येथील वाहने आणि सर्व सुविधा, हे सगळे सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांचे आहे.’’
३. पू. अण्णांच्या मुलांनी क्षमायाचना करणे
पू. अण्णांनी मुलांच्या मनाला जाणीव होईल, अशा प्रकारे दोन्ही मुलांना समजावून सांगितले. दोघांनीही लगेचच आपल्या संतपित्याकडे क्षमायाचना केली आणि ‘आम्ही आता आदर्श पद्धतीने साधना करू’, असे त्यांना सांगितले.
या उदाहरणावरून पू. अण्णांमधील ‘तत्त्वनिष्ठा’ माझ्या लक्षात आली.’
– श्रीमती अश्विनी प्रभु (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के, वय ५८ वर्षे), मंगळुरू, कर्नाटक. (२३.७.२०२४)