रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिल्यावर मान्यवरांनी दिलेले अभिप्राय !
आश्रम म्हणजे काय ?‘आश्रम म्हणजे केवळ भिंती नाहीत. आश्रमात रहाणारा प्रत्येक साधक हा आश्रमाचे व्यक्त रूप आहे !’ |
१. श्री. व्ही. श्रीनिवास रमण (पत्रकार, जनानेसिन न्यूज मिडिया), चेन्नई, तमिळनाडू.
अ. ‘आजकाल समाजातील हिंदु संस्कृती आणि परंपरा लोप पावत चालली आहे; मात्र आश्रमात या सर्वांचे संवर्धन केले जात आहे.
आ. येथील आश्रमजीवन आणि आहार यांविषयी शिकण्यासाठी नव्या पिढीने येथे येणे आवश्यक आहे. त्यांनी या गोष्टी शिकून घेतल्या, तर भावी पिढीसुद्धा खर्या अर्थाने ‘मानव’ म्हणून जगू शकेल.’
२. श्री. नीरज डंगवाल (सरयू ट्रस्ट), देहली
अ. ‘आश्रम पहाणे’, ही माझ्यासाठी एक दिव्य अनुभूती होती. ‘वैज्ञानिक दृष्टीकोनातून अध्यात्म जाणून घेणे’, हे आजकाल दुर्मिळ झाले आहे.’
३. श्री. अभिजित जोग (प्रबंध निर्देशक, प्रतिसाद कम्युनिकेशन प्रा. लि.), पुणे, महाराष्ट्र.
अ. ‘हिंदु संस्कृती म्हणजे अध्यात्म आणि विज्ञान यांचा सुरेख संगम आहे. आश्रमात या संगमाची अनुभूती येते.’
४. कु. रीशा गोयल, लुधियाना, पंजाब.
अ. ‘आश्रमात मला हिंदु संस्कृतीविषयी पुष्कळ नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या.
आ. ‘असा आश्रम पंजाबमध्येही असायला हवा’, असे मला वाटले.’
५. श्री. ए.एस्.एन्. गुप्ता (अध्यक्ष, आर्य वैश्य समाज), बेंगळुरू, कर्नाटक.
अ. ‘मी आश्रमातील स्वागतकक्षाजवळ असलेल्या चित्रातील श्रीकृष्णाचे दर्शन घेतले. तेव्हा ‘श्रीकृष्णच हिंदु राष्ट्राची स्थापना करणार’, याविषयी मला १०० टक्के आत्मविश्वास वाटला.’
६. श्रीमती रेवती कंद्रेगुला (एच्.आर्. ॲडमिन, स्ट्रिंग आर्ट प्रायव्हेट लिमिटेड), बेंगळुरू, कर्नाटक.
अ. ‘आश्रम हा पृथ्वीवरील स्वर्गाप्रमाणे आहे.’
‘संगीत’ या विषयावरील PPT (Power Point Presentation) पाहून दिलेले अभिप्राय
अ. ‘संगीत’ आणि ‘नृत्य’ यांमुळे वातावरणातील स्पंदने कशी पालटू शकतात ?’, याविषयी एका वेगळ्या दृष्टीकोनातून जाणून घेता आले.’
(सर्व सूत्रांचा दिनांक जून २०२४)
सूक्ष्म जगताविषयीचे प्रदर्शन पाहून मान्यवरांनी दिलेले अभिप्राय
१. श्री. नीरज डंगवाल (सरयू ट्रस्ट), देहली
अ. ‘अशा प्रकारचे प्रदर्शन मी कुठेच पाहिले नाही. सूक्ष्म जगताविषयीचे हे प्रदर्शन जगाकडे एका वेगळ्या दृष्टीकोनातून पहायला शिकवणारे आहे.’
२. श्री. अभिजित जोग, पुणे, महाराष्ट्र.
अ. ‘हे अध्यात्माच्या सामर्थ्याची जाणीव करून देणारे अद्वितीय प्रदर्शन आहे.’
३. श्रीमती रेवती कंद्रेगुला, बेंगळुरू, कर्नाटक.
अ. ‘मी सर्व गोष्टींचे निरीक्षण आध्यात्मिक दृष्टीकोनातून कधीच केले नव्हते. असे प्रकार जेव्हा आपल्या दैनंदिन जीवनात पहायला मिळतात, तेव्हा आपण त्यांकडे दुर्लक्ष करतो.’
(सर्व सूत्रांचा दिनांक जून २०२४)
|