साधकांच्या प्रगतीचा ध्यास असलेले सद्गुरु सत्यवान कदम (वय ६१ वर्षे) !
१. चैतन्यमय देह
‘सद्गुरु सत्यवानदादा रात्री कितीही विलंबाने झोपले किंवा काही कारणाने त्यांची रात्री झोप झाली नाही, तरीही ते पहाटे त्यांच्या ठरलेल्या वेळेतच उठतात. त्यांच्या चेहर्यावर थकवा किंवा झोप पूर्ण न झाल्याचा ताण दिसत नाही. ते सदैव चैतन्यमय दिसतात.
२. हळुवार चालणे
सद्गुरु सत्यवानदादा चालत असतांना आवाज होत नाही.
३. स्वावलंबी
सद्गुरु सत्यवानदादा त्यांचे कपडे धुणे, जेवणानंतर ताट धुणे, कपड्यांना इस्त्री करणे, बाहेर जायचे असल्यास ‘बॅग’ भरणे इत्यादी स्वतःच करतात. साधकांनी सद्गुरु दादांना ‘तुमचे ताट घासतो किंवा कपडे धुतो’, असे सांगितल्यास ते म्हणतात, ‘‘तुम्ही असे केले, तर माझी हे सर्व करण्याची सवय मोडेल.’’
४. काटकसरी
‘कितीही उष्णता असली, तरीही सद्गुरु सत्यवानदादा वातानुकूलित यंत्र (कूलर किंवा ए.सी.) हवे’, असे सांगत नाहीत. ते पंखाही आवश्यकतेनुसार लावतात.
५. इतरांचा विचार करणे
एकदा त्यांनी एका साधिकेला त्यांचे कपडे धुवायला दिले होते. तेव्हा त्यांनी त्या साधिकेला आपुलकीने विचारले, ‘‘तुम्हाला कपडे धुतांना त्रास होणार नाही ना ?’’ ‘स्वतःमुळे इतरांना कोणताही त्रास होऊ नये’, यासाठी सद्गुरु दादा सतर्क असतात.
६. सद्गुरु सत्यवानदादांना रात्रंदिवस साधकांच्या प्रगतीचा ध्यास असतो.’
– एक साधक, कुडाळ सेवाकेंद्र, सिंधुदुर्ग. (२.८.२०२४)