Bangladesh Chief Justice Resign : आंदोलनकर्त्यांनी घरावर आक्रमण करण्याची धमकी दिल्याने बांगलादेशाच्या सरन्यायाधिशांचेही त्यागपत्र
ढाका (बांगलादेश) – येथे सर्वोच्च न्यायालयाला बाहेर आंदोलकांनी निदर्शने करत सरन्यायधिशांना त्यागपत्र देण्यास भाग पाडले आहे. ‘त्यागपत्र दिले नाही, तर घरावर आक्रमण केले जाईल’ अशी धमकी त्यांना देण्यात आली होती. यामुळे सरन्यायाधीश ओबैदुल हसन यांना आंदोलकांपुढे झुकावे लागले. या वेळी अपील विभागाच्या न्यायाधिशांनाही त्यागपत्र द्यावे लागले. ओबैदुल हसन हे माजी पंतप्रधान शेख हसीना यांचे निकटवर्तीय मानले जातात.