पाचोरा (जिल्हा जळगाव) येथे २ अल्पवयीन विद्यार्थिनींच्या अपहरणाचा प्रयत्न नागरिकांच्या सतर्कतेने फसला !
२ भोंदू फकीर धर्मांधांना नागरिकांकडून चोप !
जळगाव – जिल्ह्यातील पाचोरा शहरातील मानसिंगका कॉर्नर रस्त्याने शाळेतून घरी जाणार्या २ अल्पवयीन मुलींना २ भोंदू फकिरांनी ‘घरी सोडतो’, असे खोटे सांगून त्यांचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला; मात्र वेळीच हे कारस्थान लक्षात येताच नागरिकांनी त्या भोंदू फकिरांना चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले. (सतर्क हिंदु नागरिकांचे अभिनंदन ! – संपादक) या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. मुसा शहा ईसा शहा फकीर (वय ४७ वर्षे) आणि लियाकत शहा उस्मान शहा (वय ७१ वर्षे) हे दोघे कासोदा येथील आहेत. या घटनेमुळे पालकांनी चिंता व्यक्त केली आहे.
मिठाबाई कन्या विद्यालयात इयत्ता ७ वीत शिक्षण घेणार्या कु. मानसी प्रकाश मोरे (वय १२ वर्षे) आणि इयत्ता ५ वीतील कु. जान्हवी संजय सोनवणे (वय १० वर्षे) या मैत्रिणी दुपारी १२ वाजता शाळा सुटल्यानंतर शिवाजीनगर येथील त्यांच्या घरी जात होत्या, तेव्हा ‘मानसिंगका कॉर्नर’जवळ धर्मांध मुसा शहा फकीर आणि लियाकत शहा हे दोघे भोंदू फकीर दुचाकीवरून भर रस्त्यात त्या अल्पवयीन मुलींजवळ आले. त्यांना बळजोरीने उचलून घेऊन जातांना नागरिकांनी सतर्कतेने त्या दोघांना पकडून चांगलाच चोप दिला. हे दोघेही ६ ऑगस्ट या दिवशी या दोन्ही मुलींवर पाळत ठेवून त्यांचा पाठलाग करत होते, अशी माहिती त्या मुलींनी दिली आहे. ‘पोलीस प्रशासनाने याकडे लक्ष देऊन संशयितरित्या फिरणार्यांशी चौकशी करून कारवाई करावी’, अशी मागणी पालकांकडून होत आहे.
An attempt to abduct 2 minor schoolgirls in Jalgaon Dt thwarted by vigilant citizens
Fake fakirs thrashed by citizens
Shameless police passing the responsibility onto citizens instead of explaining what they themselves will do to stop such incidents !
https://t.co/TivZ04i6er— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) August 11, 2024
‘स्वतः काय करणार ?’ ते सांगायचे सोडून नागरिकांवर दायित्व ढकलणारे निलाजरे पोलीस !सर्व यंत्रणा हाताशी असून पालकांना सतर्कता बागण्यास सांगणारे पोलीस प्रशासन काय कामाचे ? अशा निष्क्रीय आणि कामचुकार पोलीस प्रशासनाचा पांढरा हत्ती पोसायचा तरी कशाला ? या संदर्भात पाचोरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक पवार म्हणाले, ‘‘झालेला प्रकार हा गंभीर आहे. शाळेतून एकट्याने ये-जा करणार्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी सतर्कता बाळगावी; जेणेकरून अशा घटना कुठेतरी थांबवता येतील.’’ पोलीस निरीक्षक अशोक पवार यांची प्रतिक्रिया !(म्हणे) ‘भिक्षुकां’कडून मुलींच्या अपहरणाचा प्रयत्न झालाच नाही !’पोलिसांनी दोन्ही फकिरांना सोडून दिले ! ‘भिक्षुक’ ही हिंदु धर्मातील संकल्पना आहे. मुसलमान नावाचे भिक्षुक कसे असतील ? मुल्ला-मौलवींच्या अत्याचाराच्या वृत्तांना हिंदु साधूचे चित्र दाखवणार्या आणि मथळ्यात ‘बाबा’ शब्द वापरणार्या साम्यवादी मुसलमानधार्जिण्या पत्रकारितेप्रमाणे पोलीसही फकिरांना ‘भिक्षुक’ म्हणत आहेत. पोलिसांनी प्रकरण कितीही दाबायचा प्रयत्न केला, तरी हिंदू आता जागृत झाले आहेत, हे त्यांनी लक्षात घ्यावे. तसेच मुसलमानांच्या दृष्टीने पोलीसही ‘काफीर’च असतात, हेही लक्षात घ्यावे ! याविषयी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीने पाचोरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक पवार यांना संपर्क साधून या ‘२ आरोपींना अटक केली का ?’ असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले, ‘‘पाचोरा येथे २ अल्पवयीन मुलींच्या अपहरणाचा प्रयत्न मुळी झालाच नाही. फकीर मुसा शहा आणि लियाकत शहा हे दोघे ‘भिक्षुक’ होते. ते रस्त्यावर भिक्षा मागून उदरनिर्वाह करत असतात. त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करून आम्ही त्यांना सोडून दिले आहे. (अपहरणाचा प्रयत्न झालाच नाही, तर त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई तरी कशाला केली ? – संपादक) ‘वर्तमानपत्रात तर २ मुलींच्या अपहरणाचा प्रयत्न’ अशाच बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत, मग तुम्ही तर वेगळी माहिती देता’, असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले, ‘‘वर्तमानपत्रात मुलीचे अपहरण म्हणून चुकीच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. २ वृत्तपत्रांनी माझ्या नावावर प्रतिक्रिया छापली आहे; मात्र मी कोणताही पत्रकार अथवा वर्तमानपत्र यांना प्रतिक्रिया दिलेली नाही.’’ (असे आहे, तर पोलीस त्या वर्तमानपत्रांवर काही कारवाई करणार का ? – संपादक) मुळात त्या दोन्ही फकिरांना नागरिकांनी पकडून चोप दिलेला असतांना पोलीस निरीक्षक पवार यांनी दिलेली आश्चर्यकारक प्रतिक्रिया संभ्रम निर्माण करणारी आहे. महाराष्ट्रात १ लाख महिला आणि मुली बेपत्ता असूनही पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेऊन त्याचे अन्वेषण केलेले नाही, असेच यातून दिसून येते. |
संपादकीय भूमिका
|